Pune Rain news : राज्यातीसल अनेक जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर चांगलाच वाढलेला दिसत आहे. अशातच पुणेकरांसाठी देखील एक आनंदाची बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरण क्षेत्रात चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यामध्ये रात्रभर झालेल्या पावसामुळं पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरण क्षेत्रामध्ये चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. यामुळं धरणाच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांवर जे पाणी कपात लागू करण्यात आली आहे ती लवकरच दूर होण्याची शक्यता आहे. 


कोणत्या धरण क्षेत्रात किती पाऊस


सध्या पुणे धरण परिसरात चांगला पाऊस सुरु आहे. कालपासून पुणे शहराला पिण्यासाठी आणि जिल्ह्याला शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रात्रभर पाऊस सुरु आहे. त्यामुळं पाणीसाठ्यात बर्‍यापैकी वाढ झाली आहे. खडकवासला 18 मिमी, पानशेत 68 मिमी, वरसगाव 70 मिमी आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 65 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर या चारही धरणांचा उपयुक्त पाणीसाठा 3.67 टीएमसी झाला आहे. सोमवारपासून पुण्यात सात दिवसांसाठी पुण्यात पाणीकपात लागू करण्यात आली आहे. हा पाऊस असाच पडत राहिल्यास पुणेकरांची पाणी कपातीतून  सुटका होण्याची शक्यता आहे.


पुणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट


भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात 5 ते 9 जुलै या कालावधीत मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, गोवा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रासाठी एकाकी अत्यंत मुसळधार पावसासह जोरदार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. सातारा, पुणे, नाशिक घाट परिसरात असाच पाऊस पडण्याची शक्यता आहे.  पुणे आयएमडीने ट्विट करत दिली आहे. कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. सातारा, पुणे, नाशिक घाट परिसरात असाच पाऊस पडण्याची शक्यता आहे. एनडीआरएफच्या दोन तुकड्याही कोल्हापुरात तैनात आहेत.
मुंबई आणि उपनगरासह कोकणातील सर्वच जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. कोकणात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये देखील पावसाचा जोर वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.