पुणे : पुण्यामध्ये चोरांचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे. 12 डिसेंबरला डीपी रोडवर एका लग्नातून अल्पवयीन चोरट्यानी चक्क १७ तोळे सोनं लुटल्याची घटना उघडकीस झाली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे.

कोणाला संशय येऊ नये म्हणून चोरट्यानी एक नामी शक्कल लढवली. हा चोरटा थेट लग्नात कोट घालून आला आणि नंतर सोनं ठेवण्यात आलेल्या पर्सवर त्यांनी कोट ठेवला. आपल्याकडे कोणाचं लक्ष नाही हे कळताच तो तिथून पर्स घेऊन पसार झाला.

घटनेच्या दिवशी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवला होता. आता सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून त्याआधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे सोनं मुलीच्या नातेवाईकांचं असून सध्या पोलीस चोरांचा कसून शोध घेत आहेत. मात्र, अशा कार्यक्रमात येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवून आपण आपल्या वस्तूकडे लक्ष देणं गरजेचे आहे. असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.

दरम्यान, कालच (मंगळवार) साहित्यिक  पु. ल. देशपांडे यांच्या पुण्यातील घरात चोरी झाल्याचे समोर आलं होतं. घर बंद असताना सोमवारी पहाटे चोरांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटांचेही कुलूप तोडले. पुलंची हस्तलिखितं आणि पुस्तकं चोरांनी अस्ताव्यस्त केली. त्यापलिकडे त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे तिथून त्यांनी पळ काढला होता.

संबंधित बातम्या :

पुलंच्या घरात चोर घुसले, पुस्तकंच पुस्तकं पाहून पळाले!