पुण्यातील मंगळवार पेठेतल्या गोडाऊनला भीषण आग
एबीपी माझा वेब टीम | 03 Apr 2017 09:25 AM (IST)
पुणे: पुण्यातल्या मंगळवार पेठेतल्या हॉटेल टुरिस्टसमोरील गोडाऊनला आज सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 9 बंब घटनास्थळी दाखल झाले. गेल्या तीन तासापासून आग विझवण्याचं काम सुरु आहे. दरम्यान ही आग आटोक्यात आली असली तरी संपूर्ण आग विझवण्यास आणखी बराच वेळ लागू शकतो. मंगळवार पेठेतल्या हॉटेल टुरिस्टसमोर हे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये दोन कोळशाची वखारं आणि इतर मशीनरी यामध्ये होत्या. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, या आगीत आतापर्यंत किती नुकसान झालं आहे हे समजू शकलेलं नाही.