पुण्यातील मंदिरातून देवाचे डोळे चोरीला!
एबीपी माझा वेब टीम | 03 Jul 2017 10:13 AM (IST)
पुणे : पुण्यात मंदिरातून देवाच्या मूर्तीचे चांदीचे डोळे चोरील गेले आहेत. दत्तवाडीतील अखिल दत्तवाडी म्हसोबा मंदिरात हा प्रकार घडला आहे. देवदर्शनाच्या बहण्याने चोर मंदिरात शिरला. मंदिरातील पुजारी बाहेर बसले होते. यावेळी चोराने आजूबाजूला पाहून देवाच्या मूर्तीचे डोळेच काढले आणि पसार झाला. चोरीचे दृश्य मंदिरातील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यामुळे पोलिसांना तपासात मोठी मदत होणार आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तपासही सुरु केला आहे.