तळेगावात रेल्वे ट्रॅकशेजारी तरुणीचा मृतदेह सापडला
एबीपी माझा वेब टीम | 22 Dec 2016 10:57 AM (IST)
पुणे : तळेगाव महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकशेजारी सापडला आहे. ही तरुणी घरी न परतल्यानं तिच्या वडिलांनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. तळेगाव दाभाडे गावातील 11वी मध्ये शिकणारी महाविद्यालयीन तरुणी काल घरी परतली नाही. त्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली. मात्र रात्री उशिरा तरुणीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकशेजारी आढळला. त्यामुळे तरुणीला रेल्वेची धडक बसल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अपघातावेळी तरुणीसोबत तिचा मित्रही होता. त्याचा या अपघातात हात निखळला आहे. दरम्यान तरुणी रेल्वे ट्रॅक ओलांडताना हा अपघात झाला असल्याचा अंदाज व्यकत करत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. जखमी मित्राला खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे.