पुण्यात पोलिस व्हॅनच्या धडकेत 14 वर्षीय तरुणी गंभीर जखमी
एबीपी माझा वेब टीम | 18 May 2016 02:45 PM (IST)
पुणे : पुण्यातील नगर बीआरटी मार्गावर पोलीस व्हॅनची धडक बसून 14 वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. विशेष म्हणजे तिला धडक देणारी गाडी अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची असल्याची माहिती आहे. आकांक्षा धनविज असं या मुलीचं नाव असून तिच्यावर सध्या सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बीआरटी मार्गातून बस व्यतिरिक्त अन्य वाहनांना परवानगी नसताना पोलीस व्हॅन कशी नेण्यात आली, असा सवाल उपस्थित होत आहे. याप्रकरणी अद्याप गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही. बीआरटी मार्गावरील अपघाताचे पडसाद महापालिकेतही उमटले. राष्ट्रवादीविरोधात एकवटून सर्वपक्षीयांनी बीआरटीविरोधात जोरदार निदर्शनं केली.