Pune Corona Vaccination : पुणे शहरात 50 लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. यामध्ये 65 टक्के नागरिकांना मोफत लस देण्यात आली आहे. तर 35 टक्के लोकांना यासाठी पैसे मोजले आहेत. पुणे शहराचं 100 टक्के लसीकरण होण्यासाठी मार्च 2022 पर्यंतचा कालावधी लागू शकतो, असं एका वरीष्ठ अधिकाऱ्यानं टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं. वरीष्ठ आधिकाऱ्यानं सांगितलं की, डिसेंबर अखेरपर्यंत पुणे शहरातील 100 टक्के लसीकरण होणं कठीण आहे. दुसऱ्या डोसचा 84 दिवसांचा कालावधी आणि लसींचा तुटवडा, या दोन प्रमुख कारणामुळे पुणे शहराच्या 100 टक्के लसीकरणासाठी मार्च 2022 पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. पुण्यातील 18 ते 44 वयोगटातील 19 लाख 21 हजार लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. 44 लाख 69 हजार जणांनी फक्त एक डोस घेतला आहे. म्हणजेच पुण्यातील 41 टक्के लोकांनी लसीचे दोन डोस घेतले आहे. तर 60 वर्षांवरील 8.69 लाख जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर 11 लाख 7 हजार जणांनी लसीचा एक डोस घेतला आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जवळपास 6 लाख पुणेकरांना अद्याप एकही डोस मिळालेला नाही. ऑक्टोबर अखेरपर्यंत या सर्वांना पहिला डोस देण्याचं उद्धिष्ट ठेवण्यात आलेय. पुढील काही दिवसांत पहिला डोस घेणाऱ्यांचा दुसरा डोस जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होऊ शकतो. कोविशिल्ड लस घेणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे, तो सहज रित्या उपलब्ध आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला पहिला डोस घेणाऱ्यांचा दुसरा डोस वर्षाअखेरपर्यंत होईल. पुणे जिल्ह्यातील आर्ध्याहून आधिक लोकसंख्येला अद्याप लस मिळालेली नाही. पुणे आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. संजय देशमुख म्हणाले की, या महिन्यात पहिला डोस घेणाऱ्यांचा दुसरा डोस 54 दिवसानंतर होईल. लसीकरणासाठी पात्र असलेल्या पुण्यातील सर्वांच्या लसीकरणाला मार्च 2022 पर्यंतचा कालावधी लागेल. पुढील काही दिवसांत लसीकरणासाठी पात्र असलेल्या 50 टक्के लोकांचे दुसरे डोस पूर्ण होतील. ही संक्या 42 लाख इतकी असेल.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, डिसेंबर अखेरपर्यंत पात्र असणाऱ्या नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण होऊ न शकण्यासाठी विविध कारणं आहेत. जिल्ह्यातील 14 ते 15 टक्के लोकसंख्या बदलणारी आहे, त्यामुळे येणाऱ्यांचं लसीकरण झालं आहे का? हे तपासून पाहवं लागणार आहे. ग्रामीण भागातील काही लोक लस घेण्यास संकोच करत आहेत. त्यांचं लसीकरण करणं हे आमच्यासमोरील मोठं आव्हान असेल. पण आम्ही त्यासाठी सामाजिक संस्था आणि राजकीय नेत्यांसोबत काम करत आहोत. त्यांच्या मार्फत अनेकांचं लसीकरण होईल. हवेलीमधील जवळपास तीन लाख आणि दौंडमधील एक लाख नागरिकांनी पहिला डोसही घेतला नाही. हवेलीतील काही जणांनी पुणे शहरातून पहिला डोस घेतला आहे. ग्रामीण भागातील सर्वांच्या लसीकऱण प्रमाणपत्रावर आम्ही बारकाईने नजर ठेवून आहोत. दौंडमध्ये आम्ही लसीकरणासाठी काही उपाययोजना करत आहोत, उर्वरित नागरिकांचं लवकरात लवकर लसीकरण पूर्ण होईल.