Baramati News : बारामती तालुक्यातून अत्यंत (baramati) दुख:द घटना समोर आली आहे. बारामती तालुक्यातील खांडज येथे गोठ्यातील बायोगॅस टाकीची साफसफाई करताना एकाच कुटुंबातील चार लोकांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. या चार जणांमध्ये बाप-लेकाचा समावेश आहे. गायीच्या गोठ्यातील शेण आणि गोमूत्राची टाकी साफ करत असताना चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. प्रकाश आटोळे, प्रवीण आटोळे, भानुदास आटोळे, बाबुराव गव्हाणे अशी चार जणांची नावं आहे. बारामती शहरातील सरकारी सिल्वर जुबिली हॉस्पिटलमध्ये त्यांना प्राथमिक उपचारासाठी आणले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.


 


संविस्तर बातमी थोड्यावेळात...