पिंपरी-चिंचवड: पिंपरी चिंचवडमधल्या बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातून 4 मगरी गायब झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत प्राणी संग्रहालयात 16 मगरी होत्या. त्यापैकी 4 मगरी नोव्हेंबर महिन्यात गायब झाल्या तर डिसेंबर महिन्यात 4 मगरींचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कबूल केलं.

प्राणी संग्रहालयात मोठी सुरक्षा असताना मगरी गायब झाल्याच कशा? असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्राणीसंग्रहालयातल्या मगरींची तस्करी झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे.

दरम्यान तत्कालीन अधिकाऱ्यांची बदली झाल्याचं कारण देत नवनियुक्त अधिकाऱ्यांनी हात वर केले आहेत. मध्यंतरी याच बहिणाबाई प्राणी संग्रहालयात 20 सापांचा मृत्यू झाला होता.