पिंपरी चिंचवड:  महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत असल्याचं चित्र दिसून येत आहे, अशातच बैठका, युती, पक्षांतर, जागावाटप यांना वेग आला आहे, यादरम्यानच पिंपरी चिंचवडमध्ये (PCMC Elections) पहिला अर्ज भाजपच्या इच्छुक उमेदवाराने (PCMC Elections) दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे. अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीचं माजी उपमहापौर सचिन चिंचवडेंनी ही रिस्क घेत, प्रभाग क्रमांक 17 ड च्या जागेवर दावा ठोकला आहे. (PCMC Elections) 

Continues below advertisement

PCMC Elections:  24 हा माझ्यासाठी शुभ आकडा असल्यानं...

खरं तर भाजप हा शिस्त प्रिय पक्ष मानला जातो, असं असताना अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाची परवानगी घेण्याचा नियम भाजपमध्ये नाही, असं चिंचवडेंचं म्हणणं आहे. दुसरीकडे भाजपमध्ये मोठं इनकमिंग सुरु आहे, अशा प्रसंगी तुमच्या जागेवर कोणी आयाराम अतिक्रमण करेल, या भीतीने तर तुम्ही अर्ज दाखल करण्याची घाई केली नाही ना? असा प्रश्न विचारला असता, 24 हा माझ्यासाठी शुभ आकडा असल्यानं मी याचं दिवशी अर्ज दाखल करण्याचं ठरवलं होतं, असं म्हणत पक्ष मलाच एबी फॉर्म देईल आणि मीचं पक्षाचा अधिकृत उमेदवार असेन असा दावा ही चिंचवडेंनी व्यक्त केला आहे. पण त्यांच्याच प्रभागातील ओबीसीच्या जागेवर लढण्यास इच्छुक असणारे भाजपचे माजी सभागृह नेते नामदेव ढाकेंनी ही रिस्क घेतली नाही. मी 26 डिसेंबरला अर्ज भरेन असं त्यांचं म्हणणं आहे. तोपर्यंत भाजपची यादी जाहीर होईल आणि आम्ही दोघे ही भाजपचे अधिकृत उमेदवार असू, अशी सावध भूमिका ढाकेंनी घेतलीये. 

PCMC Elections:  पिंपरी चिंचवडमधील युती-आघाडी सध्यस्थीती

भाजप + शिंदे सेना + आरपीआय आठवले गट अशी महायुती होणार आहे. 128 पैकी शिंदे शिवसेनेला 9 ते 14 जागा तर आरपीआयला 2 ते 3 जागा देण्याच्या मानसिकतेत भाजप आहे. पण हे शिंदे शिवसेनेला आणि आरपीआयला मान्य होईल का? हे पाहणं महत्वाचं असेल. या जागा वाटपात तिढा निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून युतीची होणारी घोषणा बारगळली आहे. तर अजित पवार राष्ट्रवादीकडून शरद पवार राष्ट्रवादी, काँग्रेस, उबाठा, मनसे सोबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला झाला की 26 किंवा 27 डिसेंबरला ही घोषणा होऊ शकते. अजित पवारांची राष्ट्रवादी 90 ते 100 जागा आणि उर्वरित पक्ष 28 ते 38 जागा असा फॉर्म्युला ठरला तरचं ही महाविकास आघाडी होऊ शकते. अजित पवार राष्ट्रवादीकडे उर्वरित पक्षांनी अधिकच्या जागांची मागणी केल्यास, ही नवी आघाडी निर्माण होण्यापूर्वीचं त्यांच्यात बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Continues below advertisement