पिंपरी चिंचवड : रावण सेनेचा प्रमुख अनिकेत जाधव याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी काळभोर टोळीचा प्रमुख सोन्या काळभोर याच्यावर गोळीबार झाला. मात्र त्याने गोळी चुकवल्याने दोन साथीदारांना गोळी लागली. निगडीमधील साईनाथनगर येथे काल रात्री घटना घडली.
काळभोर टोळीतील अमित फार्निस आणि जीवन सातपुते हे दोघे जखमी झाले.
20 नोव्हेंबर रोजी रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधवची आकुर्डीत हत्या झाली होती. अनिकेतवर तलवारीने वार करत, दगडाने डोकं ठेचण्यात आले होते.
पूर्ववैमनस्यातून अनिकेतची हत्या झाल्याचा अंदाज त्यावेळी वर्तवण्यात आला होता. मात्र आता काळभोर टोळीच्या प्रमुखावर हल्ला केल्याने हा गँगवॉर असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे आगामी काळात हे प्रकार रोखण्याठी आणि या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी निगडी पोलीस काय पावलं उचलतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.