पिंपरी : पिंपळे गुरवमध्ये योगेश शेलार या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला आहे. दोन अज्ञातांनी हा गोळीबार केला असून गोळीबारामागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास गावातील योगेश शेलार तुळजाभवानी मंदिरातून देवीचं दर्शन घेऊन बाहेर पडत होते. यावेळी स्विफ्ट कारमधून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात शेलार यांच्या पायाला गोळी लागली आहे.
या हल्ल्याचं कारण अद्याप कळू शकलं नाही. पण योगेश रोज एकाच वेळी मंदिरात दर्शनाला जातात. तेव्हा त्यांच्यावर नजर ठेऊनच हा गोळीबार झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, पुण्यातील स्वस्त घर देण्यासंदर्भातील सचिन आग्रवाल प्रकरणानंतर योगेश आग्रवाल यांना काळ्या यादीत टाकण्यात आले होते. त्यांनी आपल्या सृष्टी रेसिडेंसी प्रोजेक्टमध्ये स्वस्त घरं देण्याचं आश्वासन देऊन, अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आल्याची माहिती आहे.
या प्रकरणाचा तपास सांगवी पोलीस करत आहेत.