पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोला काल (गुरुवार) रात्री आठच्या सुमारास भीषण आग लागली आहे. बारा तास उलटून गेल्यानंतरही ही आग आटोक्यात आलेली नाही.
ही आग आटोक्यात आणण्यासाठी आग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, आग सतत भडकत असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचण येत आहे. या आगीच्या धुरामुळे मोशी परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. काल रात्री उशिरापर्यंत ही आग धुमसत होती. तसेच मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. आज सकाळी पुन्हा एकदा आगीने रौद्र रुप धारण केलं आहे.
पिंपरी-चिंचवडच्या मोशी कचरा डेपोला भीषण आग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Mar 2018 07:50 AM (IST)
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोला काल (गुरुवार) रात्री आठच्या सुमारास भीषण आग लागली आहे. बारा तास उलटून गेल्यानंतरही ही आग आटोक्यात आलेली नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -