Pune Pmc News: 1 जुलै 2022 पासून "सिंगल-युज प्लास्टिक" च्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यांना विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनंतर पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) अॅक्शन मोडवर आली आहे. शुक्रवारी (1 जुलै) "सिंगल-युज प्लास्टिक"च्या वापरावर दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुणेकरांना या नियमांचं पालन करावंच लागणार आहे. उल्लंघन करणार्यांकडून पहिल्याच दिवशी एकूण सुमारे 70,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
महानगरपालिकेने किरकोळ विक्रेते, भोजनालये आणि ग्राहकांसह सर्व सिंगल-युज प्लास्टिक वापरणाऱ्यां शिक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंगल-युज प्लास्टिक वापर याआधीच बंद केला आहे असा दावा शहरातील व्यापारी आणि भोजनालयांनी केला आहे. लहान व्यावसायिक त्याचा वापर करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे. शुक्रवारी 391 किलो प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला किमान 14 ठिकाणी कारवाई केल्याची माहिती आहे.
गेल्या महिन्याच्या शेवटपर्यंत आम्ही रहिवासी आणि व्यवसाय मालकांना सिंगल-युज प्लास्टिकवरील संपूर्ण बंदीबद्दल जागरुकता मोहीम राबवली. शहरातील पालखी मिरवणुकीदरम्यानसुद्धा ही मोहीम राबविण्यात आली होती. या नियमांचं पालन न कराणाऱ्यांवर कारवाई करुन त्यांच्याकडून दंड वसूल करणार आहोत, अशी माहिती
पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या प्रमुख आशा राऊत यांनी दिली आहे.
या सगळ्या प्रकाराची पुनरावृत्ती होताना दिसल्यास 5,000 रुपये, 10,000 रुपये आणि 25,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल, त्यानंतर एफआयआर दाखल केला जाईल. आम्ही यावर चर्चा करण्यासाठी एक बैठक घेऊ आणि शुल्क कमी करू, असंही त्या म्हणाल्या.
आम्हाला प्लास्टिक व्यतिरिक्त पिशवी वापरण्याची सवय झाली आहे. आम्ही कागदी किंवा कापडाच्या पिशवीचा वापर करतो. त्यामुळे बंदीचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. लहान खाद्य विक्रेते वापरु शकतात. लहान विक्रेते पुण्यात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्यावर याचा परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे पर्यावरणाला त्रास होतो असं कृत्य लहान व्यापाऱ्यांनी देखील करु नये, असं व्यापारी संघटनेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका म्हणाले.