Pune Crime News: एका अल्पवयीन मुलीवर एका लॉजमध्ये अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील (Pune) तळेगाव दाभाडे येथे हा प्रकर घडला आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड (pcmc) पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शुभम लॉजमध्ये ही घटना घडली. पीडितेच्या आईने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या सगळ्या प्रकरणाचा तपास तळेगाव दाभाडेचे पोलीस करत आहेत.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी 23 वर्षीय आरोपीला अटक केली असून तो तळेगाव दाभाडे येथील रहिवासी आहे. तक्रारदाच्या घराशेजारी आरोपीचे नातेवाईक राहत होते. त्या परिसरात तो वारंवार येत असे. त्यामुळे आरोपीची तक्रारदाच्या 12 वर्षीय मुलीशी ओळख झाली. आरोपी मुलीला लॉजवर घेऊन गेला. येथे आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच मुलीला व तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.
लग्नाचं आमिष दाखवून केला अत्याचार
पहिला विवाह झाला असताना 28 वर्षीय तरुणीला विवाहाचं अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसराती पोलीस ठाण्यात या प्रकरणाबाबत 28 वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली होती. यावरुन आरोपीला अटक करण्यात आली होती. जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. तरुणी पुण्याची रहिवासी असून आरोपी हा मध्यप्रदेशचा रहिवासी आहे.
आरोपीने आणि तरुणीची ओळख इंस्टाग्रामवरुन झाली होती. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. आरोपीचा आधीच एक विवाह झाला असताना देखील तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर अनेक दिवस दोघे सोबत राहिले. तरुणीच्या घरी देखील आरोपीची कायम ये-जा असायची शिवाय घरी, गोवा, मुंबईत देखील दोघे फिरायला गेले असता तिच्यावर बलात्कार केल्याचं तरुणीने सांगितलं आहे. तरुणीवर जबरदस्ती करुन तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. विवाह न करता तरुणीची फसवणुक केली, असं तक्रारीत लिहिले होते.