पुणे: पुण्यात एक भीषण अपघात (Pune Accident News) झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे- नगर रोडवर कारेगाव येथे दोन दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात (Pune Accident News) एक जण ठार झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पुणे-नगर महामार्गावरील फलके मळ्याजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकी व्यक्तीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर एक गंभीर जखमी आहे. संदीप नामदेव गाडीलकर (वय-35, रा. शिंदोडी, ता. शिरूर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर दत्तात्रय धुमाळ असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. जखमी व्यक्तीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.


भीषण अपघाताची ही घटना 20 ऑगस्टला पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव येथील फलके मळा चौक परिसरात घडली आहे. याबाबत  मृत संदीप नामदेव गाडीलकर यांच्या कुटुंबातील विशाल बाळू गाडीलकर (वय-24 वर्ष) यांनी अज्ञात चालक विरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे.


 






भीषण अपघाताबाबत (Pune Accident News) पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव येथील फलके मळा चौक परिसरात हा भीषण अपघात झाला आहे. अज्ञात चालक हा पुणे-नगर रस्त्यावर रस्ता ओलांडून कर्डलवाडीकडे जात होता. त्याचवेळी रस्त्याच्या नियमांचे उल्लंघन करून कोणताही इशारा न देता, तसेच महामार्गावरील वाहनांना प्राधान्य न देता अचानक वळल्याने पुण्याच्या दिशेने येणारे संदीप नामदेव गाडीलकर आणि दत्तात्रय धुमाळ यांची दुचाकी अज्ञात चालकाच्या दुचाकीला जोरदार धडकली. 


या अपघातात संदीप गाडीलकर यांचा जागीच मृत्यू (Pune Accident News) झाला, तर दुचाकी चालक दत्तात्रय धुमाळ यांच्या डोक्याला आणि शरीरावर गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी रांजणगाव गणपती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल


या भीषण अपघाताची (Pune Accident News) व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसून येते की अपघात किती भीषण आहे.