पुणे : पुण्याचे (Pune) जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Rajesh Deshmukh Pune ) यांच्या नावाने बनावट फेसबुक  (Facebook account) अकाऊंट काढून एका खाजगी वृत्तवाहीनीच्या पत्रकाराकडून 70 हजार रुपये उकळणाऱ्या आरोपीला पुणे सायबर पोलिसांनी राजस्थान मधून ताब्यात घेतलं आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावाने फेसबुकवर त्यांचे फोटो लावून प्रोफाइल तयार करून आरोपी शहारुख खान याने फर्निचर विकण्याच्या बहाण्याने पैसे उकळले होते. 


राजस्थान मधल्या अलवर नगर जिल्ह्यातील बहादुरपूर गावातून  शहारुख खानला सायबर पोलिसानी ताब्यात घेतलं आहे. आरोपीने राज्यातील अनेक IPS आणि IAS अधिकार्यांचे बनावट प्रोफाइल फेसबुकवर बनवून लाखो रुपये उकळले असल्याची माहीती चौकशीतून समोर आली आहे. 


उपजिल्हाधिकारी रडारवर 


काही दिवसांपूर्वी पुण्याचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांचंदेखील बनावट फेसबूक अकाऊंट तयार करण्यात आलं होतं. त्यांचं बनावट फेसबुक अकाऊंटवरुन मेसेज करुन फर्निचर विकण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. 'कोणीतरी माझे फेक फेसबुक अकाऊंट उघडून माझ्या लिस्टमधील अनेकांना रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी मेसेंजरवर संवाद साधत आहे. फर्निचर विकण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक करण्याच्या प्रयत्नात आहे. "माझे अन्य कोणतेही फेसबुक खाते नाही. कोणीही संतोषकुमार नावाचा CRPF मधील अधिकारी माझ्या परिचयाचा देखील नाही. या फेक अकाऊंटबाबत मी फेसबुकवर रिपोर्ट केला आहे. तसेच सायबर क्राईमच्या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार नोंदवली आहे. माझ्या मित्रांना विनंती आहे की त्यांनी या प्रकाराला फसू नये आणि कोणताही आर्थिक व्यवहार करु नये," असं आवाहन त्यांनी केलं होतं.
 


खबरदारी घेण्याचंं पुणेकरांना आवाहन 


सध्या पुण्यात सायबर चोरांनी धुमाकूळ घातला आहे. रोज अनेक सामान्य नागरिकांची फसवणूक केली जाते अनेकांना फेक माहिती देत गंडा घातला. त्यामुळे आता प्रत्येकाला खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांना मोबाईलमधील अनेक गोष्टी कळत नाही त्यामुळे सहज म्हणून आलेल्या लिंकवर क्लिक करतात. त्यातून त्यांचा डेटा चोरी जाण्याची शक्यता असते किंवा अशा फेक अकाउंटवरदेखील अनेक  लोकांना विश्वास बसतो आणि सायबर चोरांच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे कोणतीही कृती करताना काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Punit Balan : एकमेकांविरोधात इर्ष्येनं गणेशोत्सव करणारी गणेश मंडळं 'देणगीदार' उद्योजक पुनीत बालनना कोट्यवधींचा दंड ठोठावताच आले 'एकत्र'!