पुणे : एक्स्प्रेस हायवेवरील मुंबई-पुणे दिशेची मार्गिका गुरुवारी दुपारी 12 ते 1 या वेळेत बंद राहणार आहे. द्रुतगती मार्गावर सूचना फलक लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

हा बंद फक्त गुरुवारी तो एकदाच चाळीस मिनिटांसाठी राहील, अशी माहिती एमएसआरडीसीने दिली आहे. यामुळे द्रुतगतीवरील वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे वळवली जाणार आहे.

गुरुवारी केवळ मुंबई-पुणे मार्गावरील, तर गणेशोत्सवानंतर पुणे-मुंबई मार्गावर असाच ब्लॉक घेऊन, सूचना फलक बसवले जातील.

द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात अथवा कोठेही वाहतूक कोंडी झाल्यास, पर्यायी मार्गजवळच प्रवाशांना तशा सूचनांसह अनेक फलक लागणार आहेत.