Continues below advertisement

पुणे : अमेरिकेतील एपस्टीन फाईल्स (Epstein Files) या 19 डिसेंबर रोजी तिथल्या संसदेत खुल्या होणार आहेत. त्यातून समोर येणारी माहिती ही जगाला हादरवणारी असेल, भारताच्या राजकारणावरही त्याचा मोठा परिणाम होईल असा दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला. एपस्टीन नावाच्या व्यक्तीने जगातील अनेक लोकांना अल्पवयीन मुली पुरवल्यात, त्यामध्ये भारतातील काही जणांचा समावेश आहे. त्यामुळे देशाचा पंतप्रधान बदलला जाईल असा आपला तर्क असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

देशातील पंतप्रधान बदलला जाईल आणि नागपूरशी संबंधित व्यक्ती पंतप्रधानपदावर बसेल असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी या आधीही केला. आताही ते त्यांच्या दाव्यावर ठाम आहेत. मोदींचे परराष्ट्र धोरण हे पूर्णपणे अयशस्वी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. एपीस्टन फाईल्समध्ये भारतातील काही आजी माजी खासदारांचीही नावे असल्याची चर्चा आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Continues below advertisement

जेफ्री एपस्टीन नावाच्या व्यक्तीने जगातील अनेक बड्या लोकांना अल्पवयीन मुली पुरवल्यात. आता त्याने आत्महत्या केल्याची बातमी आली. मात्र त्याने आत्महत्या केली नाही, त्याची हत्या झाली असण्याचा संशय आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. आपण जे काही बोलत आहोत ते अमेरिकेच्या संसदेत्या वेबसाईटवर उपलब्ध असल्याचा दावा चव्हाणांनी केला.

Jeffrey Epstein Files : बड्या नेत्यांना मुली पुरवल्या

अमेरिकेतील एपस्टीन कांड काय आहे याची माहिती देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "जेफ्री एपस्टीनने 1995 सालापासून अल्पवयीन मुलींच्या मदतीने मोठ्या राजकारण्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही मुलींच्या तक्रारीवरून त्याला 13 महिन्यांची शिक्षा झाली. नंतर त्याला पुन्हा एकदा तुरुंगात ठेवण्यात आलं. त्याने जे काय केलं ते जगासमोर येऊ नये, त्या राजकारण्यांची नावं जगासमोर येऊ नयेत म्हणून त्याच्यावर दबाव होता. ऑगस्ट 2019 मध्ये न्यूयॉर्कच्या हाय सिक्युरिटी प्रिझनमध्ये त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. पण त्यावर कुणाचाही विश्वास नव्हता.

हाय प्रिझन सिक्युरिटीमध्ये त्याला दोर कुठून मिळाला, त्याने आत्महत्या कशी केली असे प्रश्न विचारण्यात आले. पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्याचा गळा दाबून हत्या केल्याचा संशय काही जणांनी व्यक्त केला असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Epstein Files : ट्रम्प, बिल गेस्ट यांची नावे समोर

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "आपला वापर करून मोठमोठ्या राजकारण्यांना अडकवण्यात आलं, आपले लैंगिक शोषण करण्यात आल्याच्या तक्रारी शंभरच्या वर मुलींनी केल्या. त्यानंतर हे प्रकरण पुढे आलं. आता अमेरिकेच्या संसदेमध्ये ही बाब खूपच गंभीरपणे घेण्यात आली आहे. त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचेही नाव आलं आहे. माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन, बिल गेट्स यांचेही नाव आलं आहे. बिल गेट्स यांनी ते मान्यही केलं आहे. इंग्लंडचे युवराज प्रिन्स अँड्र्यू यांचेही नाव आलं. पण त्यांनी आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट केली."

Epstein Files News : जगाच्या राजकारणात उलथापालथी होणार

पुढच्या वर्षी अमेरिकेत निवडणुका आहेत. हे प्रकरण जर उघडकीस आलं नाही, किंवा दोषींना शिक्षा झाली नाही तर त्याचे परिणाम आपल्याला निवडणुकीत भोगावे लागतील अशी भीती डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासदारांना आहे. त्यांनी ट्रम्प यांच्यावर दबाव टाकला आणि ही कागदपत्र खुली करण्याची मागणी केली. त्यावर 19 नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या संसदेत एक कायदा पारित करण्यात आला आणि एका महिन्याच्या आत एपस्टीन फाईल्स खुल्या कराव्यात असं बंधन घातलं. त्यामुळे 19 डिसेंबर रोजी मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Prithviraj Chavan On Epstein Files :भारतात पंतप्रधान बदलणार?

एपस्टीन फाईल्समधील काही कागदपत्रं ही अमेरिकेतील काही खासदारांकडे आहेत. त्यातून या प्रकरणात कुणाची नाही आहेत याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. त्याच्या आधारे भारताच्या राजकारणावर परिणाम होणार असा दावा केला असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

भारतातील काही राजकारण्यांनाही हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला अशी चर्चा अमेरिकेत सोशल मीडियावर सुरू आहे. त्यामध्ये काही आजी माजी खासदार आहेत, यापेक्षा जास्त काही मी बोलणार नाही. त्यावरून मी काही वक्तव्यं केली असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

जर उलथापालथ झाली तर देशाचा पंतप्रधानही बदलू शकेल. जर पंतप्रधान बदलला तर तो काही काँग्रेसचा किंवा बारामतीचा होणार नाही. झाला तर तो भाजपचा आणि नागपूरचा होईल असं मी म्हणालो होतो.

भाजपच्या खासदारांना व्हिप

भाजपच्या खासदारांना 19 डिसेंबर रोजी व्हीप जारी करण्यात आला आहे. त्याचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाणांना विचारण्यात आला. त्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, 19 तारखेला भाजप काही विधेयकं पारित करणार आहे. त्यावर अणुउर्जा खासगीकरणाशी संबंधित विधेयकही आहे. त्यामुळे त्याचा इतर काही संबंध आहे का हे मला माहिती नाही.

आपण जो काही तर्क मांडतोय, जे काही बोलतोय ते सगळं अमेरिकेच्या संसदेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्या माहितीच्या आधारे सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

ही बातमी वाचा: