पुण्यात इंजिनिअर तरुणीची प्रेमसंबंधातून आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 17 May 2017 12:45 PM (IST)
पुणे : एका 23 वर्षीय इंजिनिअर युवतीने प्रेमसंबंधातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुण्याच्या कोंढवा भागात राहणाऱ्या या तरुणीने राहत्या घरी चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. जुही गांधी ही तरुणी नोकरीसाठी बंगळुरुमध्ये असते. शनिवारी सुट्टीच्या दिवशी ती आई-वडिलांकडे आली होती. पुण्यात घरी आल्यानंतर ती तिच्या प्रियकराशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. मात्र त्याने फोन न उचलल्याच्या रागातून या तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्या केलेली ही तरुणी मूळची पुण्यातीलच आहे. तिचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पुण्यातील सिंहगड कॉलेजमधून झालेलं आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.