Eknath Shinde Pune Visit Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर; पाच मानाचा गणपतीचं घेणार दर्शन
Eknath Shinde Pune Visit Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे पुणे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पुण्यातील मानाच्या पाच गणपतीचं दर्शन घेणार आहे. त्याचबरोबर पुण्यातील महत्वाच्या गणपती मंडळांना भेट देणार आहे.
शिवानी पांढरेLast Updated: 07 Sep 2022 03:27 PM

पार्श्वभूमी
Eknath Shinde Pune Visit Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे पुणे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पुण्यातील मानाच्या पाच गणपतीचं दर्शन घेणार आहे. त्याचबरोबर पुण्यातील महत्वाच्या गणपती मंडळांना देखील भेट देणार आहे. अभिनेते...More
Eknath Shinde Pune Visit Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे पुणे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पुण्यातील मानाच्या पाच गणपतीचं दर्शन घेणार आहे. त्याचबरोबर पुण्यातील महत्वाच्या गणपती मंडळांना देखील भेट देणार आहे. अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरच्या गणपतीचंदेखील ते दर्शन घेणार आहे.
मानाचा पहिला कसबा गणपतीची मुख्यमंत्र्यांची केली आरती
पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरती केली. यावेळी अनेक शिवसेनेचा कार्यकर्त्ये उपस्थित होते. भरपावसात अनेक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती.