Ajit Pawar :  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज पुण्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात 'जय हिंद, जय महाराष्ट्र, ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिली. त्यांच्या या घोषणेवर विरोधकांकडून जोरदार टीका होताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गट यांच्याकडून देखील प्रत्युत्तर दिलं जात आहे. दरम्यान, यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले माहित नाही, असं वक्तव्य करत अजित पवारांनी यावर बोलणं टाळलं.

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिला. यावरुन त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंद ज्यावेळी जय गुजरात म्हणाले तेव्हा मी तिथे उपस्थित नव्हतो. ते नेमकं काय म्हणाले माहित नाही अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. मी त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो, त्यामुळं ते नेमकं काय म्हणाले याबाबतची माहिती मला नाही असे अजित पवार म्हणाले. मी असेपर्यंत तरी तिथे असं काही झालं नव्हतं. आपला देश हा अनेक जाती आणि धर्मांमध्ये विखुरला गेला आहे. अनेक भाषा आपल्या देशामध्ये बोलल्या जातात. प्रत्येक राज्याची मातृभाषा कोणती ना कोणती आहे. आपली मातृभाषा मराठी आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.

नेमकं काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?

पुण्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ अशी घोषणा करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या भाषणादरम्यान, एकनाथ शिंदे यांनी "जय हिंद, जय महाराष्ट्र,जय गुजरात" असा नारा दिला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि आश्चर्याची भावना व्यक्त केली. महाराष्ट्रात होणाऱ्या मोठ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या या घोषणेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अनेक मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘जय गुजरात’ ही घोषणा महाराष्ट्राच्या भूमीत दिली गेल्याने यापुढे राजकीय चर्चांना अधिक उधाण येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घोषणेमागे कोणते राजकीय संकेत आहेत का, यावर अद्याप शिंदे किंवा त्यांच्या समर्थकांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या एका घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चेचा विषय तयार झालेला आहे.

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

उद्धव ठाकरेंचांही 'जय गुजरातचा' नारा, शिवसेना शिंदे गटाकडून 'तो' व्हिडीओ शेअर