Pune Sasoon Hospital News: पुण्यातील ससून रुग्णालयात 'एचएमआयएस' (हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम) ही रुग्ण नोंदणी संगणकीकृत प्रणाली मंगळवारी रात्री पासून बंद केल्याने  रुग्णालयात आज सकाळपासून गोंधळ निर्माण झाला आहे. रुग्ण नोंदणी ठप्प झाल्याने रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात (OPD) रुग्णांची गर्दी झाली आहे.


वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या आयुक्तांनी ससूनसह राज्यातील 16 वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमधील ही सिस्टीम बंद करण्याचा आदेश दिला आहे. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची नोंद संगणकीय प्रणालीमध्ये करणे, चाचण्यांचे अहवाल, एक्स रे यांचे अहवाल कागदावर देण्याऐवजी ते डिजिटल पद्धतीने या सिस्टिमवर उपलब्ध होतात. हीच सिस्टीम बंद पडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.


रुग्णांचे व डॉक्टरांचे काम वाचते 
रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची नोंद संगणकीय प्रणालीमध्ये करणे, चाचण्यांचे अहवाल, एक्स रे यांचे अहवाल कागदावर देण्याऐवजी ते डिजिटल पद्धतीने या सिस्टिमवर उपलब्ध होतात. यामुळे रुग्णांचे व डॉक्टरांचे काम वाचत होते. कामाचा वेग वाढत होता.


2009मध्ये हा प्रयोग सुरु 
एचएमआयएस' (हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम) ही रुग्ण नोंदणी संगणकीकृत प्रणालीचा प्रयोग करण्यात आला होता. राज्यातील 16 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हा प्रयोग सुरू केला होता. त्यानंतर रुग्णालायामध्ये रुग्णांच्या नोंदीपासून ते वैद्यकीय अहवालाची माहिती एका क्लिकवर डॉक्टरांना मिळत होती.


सकाळपासून रुग्णालयात मोठी गर्दी
एचएमआयएस' ही रुग्ण नोंदणी संगणकीकृत प्रणाली मंगळवारी रात्री पासून बंद करण्यात आली. या सिस्टीममुळे डॉक्टरांचे अनेक कामं सोपे होत होते. मात्र मंगळवारी ही हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम बंद करण्याचे आदेश आले. त्यामुळे बुधवारी नेहमीप्रमाणे रुग्ण उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल झाले. सिस्टीम बंद असल्याने बाह्य रुग्ण विभागाजवळ नागरिकांची मोठी गर्दी बघायला मिळाली.


चाचण्या कागदावर लिहून द्याव्या लागल्या


या सिस्टीममुळे रुग्णांचे अहवाल किंवा चाचण्या ऑनलाईन पद्धतीने सांगितल्या जायच्या मात्र रुग्णांचे रक्त नमुने ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन द्यावे लागत होते आणि चाचण्यादेखील कागदावर लिहून द्याव्या लागल्या.