Pune News: पुण्यात सलग दोन दिवसांपासून पावसाने माध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना आणि बळीराजाला दिलासा मिळाला आहे. पाच तासातच यादरम्यान 13 ठिकाणी झाडे पडल्याची घटना घडली आहे. काही ठिकाणी या झाडांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही आहे. अनेकदा या प्रकरणामुळे नागरिकांचं मोठं नुकसान होतं. मात्र यावर्षी अजून असं कोणतंच प्रकरण समोर आलं नाही आहे. त्यामुळे सध्यातरी नागरिकांना दिलासा आहे.
पुणे शहरात मुसळधार पावसामुळे शहरात पाच तासातच 13 जागी झाडे पडल्याच्या नोंदी अग्निशमन दलाकडे आल्या होता. अग्निशमन दलाच्या जवानांकडून झाडे हटविण्याचे काम सुरू आहे. पुण्यातील दत्तवाडी (पोलिस चौकीजवळ), शिवणे,(शिंदे पुलाजवळ), टिंगरेनगर (गल्ली क्रमांक 6), लुल्लानगर, भवानी पेठ (मनपा वसाहत क्र 10), औंध (आंबेडकर चौक), प्रभात रोड (लेन नं 14), नवीन सर्किट हाऊसजवळ, नाना पेठ (अशोका चौक), कळसगाव (जाधव वस्ती), हडपसर, कोथरुड, (मयुर कॉलनी), एरंडवणा (गुळवणी महाराज रस्ता) या सगळ्या परिसरात झाडे पडण्याच्या तक्रारी आल्या आहेत.
पुणे शहरात आजपासून पावसाची तिव्रता वाढण्याची शक्यता आहे. सोमवार 4 जूलैला शहरातील अनेक परिसरात पावसाने हजेरी लावली होती. पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने शहरात ढगाळ वातावरण आहे. पुणेकर पावसाच्या प्रतिक्षेत आहे. मुंबई- आणि कोकण भागात पावसाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे पुण्यातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोव्यात देखील पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकणाला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पहिल्यापावसात 30 झाडं पडल्याचे प्रकरणं
पहिल्याच पावसाचा पुण्यातील निसर्गाला झटका बसला होता. पुण्यातील विविध परिसरात 30 झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. भवानी पेठ बीएसएनएल ऑफिस, प्रभात रोड, औंध आंबेडकर चौक, राजभवन जवळ, गुरुवार पेठ पंचहौद, कोंढवा शिवनेरी नगर या परिसरात झाडं पडली होती.