पुणे : कायदेशीर अडचणींना तोंड देत असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसियाक डीएस कुलकर्णींच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण, त्यांचे जावई केदार वांजपे यांनी डीएसकेंवर 100 कोटींचा दावा ठोकला आहे. याची नोटीसही डीएसकेंना पाठवण्यात आली आहे.


काय आहे प्रकरण?

डीएसकेंनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या भावाचा जावई असलेल्या केदार वांजपेंवर आरोप केले होते. केदार वांजपे आपल्याबद्दल खोटी माहिती पसरवत असल्याचं डीएसके म्हणाले होते.

माहीती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांना आपल्या आणि आपल्या व्यवसायाबद्दलची माहिती वांजपे पुरवत असल्याचा आरोप डीएसकेंनी केला होता. त्यामुळे केदार वांजपेंनी डीएसकेंवर शंभर कोटींच्या बदनामीचा दावा दाखल केला आहे.

केदार वांजपे हे आधी डीएसकेंबरोबर काम करत होते. ड्रीम सिटीसाठी जागा खरेदी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. पण पुढे डीएसके आणि वांजपेंमधे आर्थिक कारणांवरुन वाद झाला आणि वांजपे 2009 मध्ये डीएसकेंपासून वेगळे झाले.