पुणे: पुण्यात दिवाळी पाडव्याची दिवशी काल(शनिवारी) रात्री घरगुती सिलेंडरचे दोन ठिकाणी स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पुण्यातील वारजे माळवाडी आणि अप्पर इंदिरानगर परिसरात दोन घरगुती सिलेंडरचे स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सिलेंडरच्या स्फोटामध्ये दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. सिलेंडरच्या स्फोटामुळे दोन्ही घरात मोठी आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून दोन्ही ठिकाणी आग वेळेत नियंत्रणात आणण्यात आली त्यामुळे मोठी हानी टळली आहे. जखमींना जवळच्या खाजगी रुग्णालयात करण्यात दाखल करण्यात आले.
या दोन्ही घटना काल (दि. 2) रात्रीच्या सुमारास वारजे माळवाडी आणि अप्पर इंदिरानगर परिसरात घडल्या आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील वारजे माळवाडी आणि अप्पर इंदिरानगर परिसरात घरगुती सिलेंडरचे स्फोट झाले. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले. जखमी व्यक्तींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही ठिकाणी लागलेल्या आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात यश आले.