Anil Bonde And Dhananjay Mahadik In Pune:  राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला. यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय खेळीची चर्चा सगळीकडे आहे. या सगळ्या निवडणुकीत दोन भाजपच्या दोन आमदारांची चर्चा होती. आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक हे दोन्ही आमदार आजारी असल्याने मतदानासाठी मुंबईत उपस्थित राहणार की नाही?, असा प्रश्न  राजकीय वर्तुळात रंगत होता. मात्र पुण्याच्या या दोन्ही आमदारांनी मुंबईत जाऊन मतादानाचा हक्क बजावला. 


या निवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. त्यात अनिल बोंडे, धनंजय महाडिक, पीयुश गोयल हे तिघंही विजयी झाले.   देवेंद्र फडणवीसांनी या विजयाचं श्रेय पुण्यातील दोन आमदारांना दिलं. त्यामुळे आज (11जून) विजयी उमेदवार धनंजय महाडिक आणि अनिल बोंडे हे पुण्यात दोन्ही गेम चेन्जर आमदारांची भेट घेणार आहे. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळकांची भेट घेणार आहे. लक्ष्मण जगतापांच्या राहत्या घरी जाऊन तर मुक्ता टिळक यांची भेट कर्वे रस्त्यावरील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटणार आहे.


आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती अत्यंत गंभीर असताना त्यांनी अॅब्यूलन्सने मुंबई गाठत मतदान केलं होतं. कुटुंबीयांची ईच्छा नसताना देखील त्यांनी प्रकृतीची जोखीम पत्करत मुंबई गाठलं. एका-एका मतासाठी भाजपचे प्रयत्न सुरु होते.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्यसभेतील भाजपचा विजय आमदार लक्ष्मण जगतापांना समर्पित केला. हीच भाऊंच्या कामाची आणि श्रद्धेची पोचपावती आहे. अशी प्रतिक्रिया आमदार जगतापांचे भाऊ शंकर जगताप यांनी दिली आहे.


आमदार मुक्ता टिळक देखील काही दिवसांपासून गंभीर आजारी होत्या त्यांनीदेखील जीवाची पर्वा न करता मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी स्ट्रेचरवर येत मतदान केलं. या दोन्ही आमदारांच्या या धैर्याचं पक्षाकडून कौतुक होत आहे. राज्यसभा निवडणुकीत एकही मत वाया जाऊ नये, म्हणून भाजप प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला. राज्यात सर्वत्र या विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे