Hapus Mango : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जगप्रसिद्ध देवगड हापूस आंब्याची या हंगामातील पहिली पेटी मालवण कुंभारमाठ येथून पुण्याला रवाना झाली आहे. कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसात मोहोर टिकवुन त्यातून फळांच्या उत्तम व्यवस्थापन करत आंब्याच्या फळांचं संरक्षण करीत मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांनी पहिली देवगड हापूसची पेटी पुण्याला पाठविली आहे. पाच पाच डझनच्या दोन पेट्या पुण्याला पाठवल्या असून त्या पेट्यांची विक्री झाली असून प्रतिपेटी १८ हजार रुपये एवढा भाव मिळाला आहे. या हंगामातील पहिली पेटी पाठविण्याचा मान त्यानी मिळवला असून कोकणातून हापूस आंब्याची पहिली पेटी पाठवण्याचा हा तिसऱ्यांदा मान मिळविला आहे. 


कोकणात हापूस आंब्याचा हंगाम सुरू व्यायाला अजूनही तीन ते चार महिन्यांचा कालावधी आहे. मात्र यावर्षीच्या हंगामातील पहिली पेटी मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांनी मिळवला आहे. त्यांनी हापूस आंब्याची पहिली पेटी पुण्याला पाठवली आहे. सिंधुदुर्गात अजूनही पाऊस पडत आहे त्यामुळे यावर्षीचा आंबा हंगामात काहीसा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अश्यात प्रगतशील आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांच्या बागेत जुनच्या शेवटच्या आठवड्यात आलेला मोहोर टिकवून ठेऊन त्यावर फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया करून त्यांनी या हंगामातील पहिली हापूस आंब्याची पेटी बाजारात पाठवली आहे.


कोकणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी २० ते २५ दिवस अगोदरच पहिली पेटी बाजारपेठेत आली आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांच्या आंबा बागेत सहा ते सात आंब्याच्या झाडांना मोहोर आला होता. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुसळधार पाऊस कोसळत असताना देखील त्यांनी योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर मोहोर टिकवून फळांचे संरक्षण केले. वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राच्या सल्ल्याने विविध कीटकनाशक, बुरशीनाशकाच्या फवारण्या केल्या. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर आंबा परिपक्व होण्यास सुरुवात झाली. काल सकाळी त्यांनी सहा झाडांवरील फळाची काढणी केली. सहा ते सात झाडांवर आलेल्या हापूस आंबाच्या दोन पेट्यां आंबा त्यांना मिळाला. हा आंबा त्यांनी पुणे येथील ग्राहकाला पाठवला.