Pooja Khedkar: काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेली वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक महाराष्ट्रात दाखल झालं आहे. सोमवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आणि पूजा खेडकरच्या (Pooja Khedkar) पुण्यातील घरी दिल्ली क्राईम ब्रांचने तपास केला आहे. त्यानंतर आज दिल्ली पोलीसांचं हे पथक अहमदनगर जिल्ह्यामध्ये तपास करणार आहे. खेडकर कुटुंबाचं मुळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील भालगाव हे आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून पूजा खेडकरला दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यासंदर्भात देखील तपासाची शक्यता आहे.
पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून 22 ऑगस्टपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आलेलं आहे. त्याआधी दिल्ली क्राईम ब्रांचला पूजा केडकर प्रकरणातील तपास करून यांची माहिती न्यायलयात देणं आवश्क आहे. त्या अनुषंगाने दिल्ली पोलिसांचे पथक सर्व तपास करत आहेत. 22 ऑगस्टपर्यंत केलेला तपास आणि अन्य माहिती दिल्ली पोलिस त्यांच्या सरकारी वकिलांच्या मार्फत कोर्टात मांडणार आहे, जेणकरून पूजा खेडकरला (Pooja Khedkar) अटक करण्याची मागणी करता येईल.
या पथकाने काल (सोमवारी) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन तपास केला. त्यानंतर पूजा खेडकरच्या पुण्यातील घरी दिल्ली स केला. त्यानंतर आज दिल्ली पोलीसांचं हे पथक अहमदनगर जिल्ह्यामध्ये तपास करणार आहे. खेडकर कुटुंबाचं मुळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील भालगाव हे आहे.
पूजा खेडकरला आपलं म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपली
पूजा खेडकरला (Pooja Khedkar) डीओपीटीने मसुरी येथील प्रशिक्षण केंद्रात उपस्थित राहण्यासाठी दिलेली मुदत काल (शुक्रवारी) संपली आहे. त्यामुळे आता यापुढे पूजा खेडकरला तिची बाजू मांडण्याची संधी यूपीएससीकडून दिली जाणार नाही. तशी नोटीस काल (शुक्रवारी) संध्याकाळी पूजा खेडकरच्या (Pooja Khedkar) पुण्यातील बाणेर रस्त्यावर असलेल्या बंगल्याच्या गेटवर आणि अहमदनगर जिल्ह्यातील भालगाव इथल्या घराच्या दरवाज्यावर डीओपीटीकडून चिकटवण्यात आली होती.
नेमकं प्रकरण काय?
पूजा दिलीप खेडकर (Pooja Khedkar) 2023 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत तिने 841 वा क्रमांक पटकावला होता. काही महिन्यापूर्वी सहायक जिल्हाधिकारी अधिकारी म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून पुणे जिल्ह्यात तिची नियुक्ती करण्यात आली होती. पण प्रशिक्षणाच्या काळातच पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडं अवास्तव मागण्या केल्यामुळं आणि अरेरावी वर्तनामुळं तिच्याबाबत प्रचंड चर्चा झाली. त्यानंतर तिथून वाशिम इथं बदली करण्यात आली होती. पूजा खेडकरने (Pooja Khedkar) दृष्टिदोष प्रवर्गातून UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि मानसिक आजाराचे प्रमाणपत्र सादर केले.
याच आधारावर तिला विशेष सवलत मिळाली आणि ती आयएएस झाली. त्यानंतर तिला सहावेळा वैद्यकीय तपासणीसाठी बोलवण्यात आलं. पण प्रत्येक वेळी त्या अनुपस्थित राहिली. तसेच पूजा खेडकरनी (Pooja Khedkar) स्वतःच्या नावात, तिच्या वडिलांच्या नावात तसेच आईच्या नावात बदल करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याचं या चौकशीत समोर आलं आहे. पूजा खेडकरनी (Pooja Khedkar) परीक्षेचा फॉर्म भरत असताना फोटो, सही, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून परीक्षा देण्याची कमाल मर्यादा ओलांडली असल्याचं यूपीएससीने सांगितलं. त्यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.