पुणे : विरोधकांच्या गाडी केवळ इंजिन आहे. ते सगळेच आळीपाळीनं पंतप्रधान व्हायच्या तयारी आहेत. विरोधकांच्या गाडीला डब्बे नाही. शरद पवारांच्या गाडीत फक्त सुप्रिया सुळेंना जागा आहे. राहुल गांधींच्या गाडीत फक्त सोनिया गांधी आणि प्रियांका गांधीसाठी जागा आहे तर उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये केवळ आदित्य ठाकरेंना जागा आहे. यांच्या कोणाच्याच गाडीत सर्वसामान्यांना जागा नाही आहे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आज पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेत त्या विरोधकांवर तुफान फटकेबाजी केली.


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोदींनी सर्जिकल स्ट्राईकसाठी शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतली.  शाहिस्तेखानाची बोटे शिवाजी महाराजांनी तोडली होती. तशीच सर्जिकल स्टाईक आणि एअर स्ट्राईक करत दुष्मनाला उत्तर दिलं. यावेळीदेखील विरोधकांना आपल्याला उत्तर द्यायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले कामं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्याशिवाय आपल्याला मोदींशिवाय पर्याय नाही आहे. एकीकडे नरेंद्र मोदी आहेत तर दुसरीकडे राहूल गांधींच्या नेतृत्वाखालील 26 पक्षांची खिचडी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 


मोदींच्या नेतृत्वात आणि राज्य सरकारच्या नेतृत्वात मुळा मुठा नदी सुधार प्रकल्प, हायवे, पुण्याला आयटी हब बनण्याचं काम मोदींच्या नेतृत्वात झालं आहे. पुण्याच्या विकासात मोदींचा मोठा वाटा आहे. त्यासोबतच कोरोना काळातदेखील मोदींनी महत्वाचे निर्णय घेतल्याने कोरोनाच्या महामारीतून देश बाहेर पडू शकला. वेळेत अनेकांना लस मिळाली. अनेक देशांना वाटत होतं की भारत आपल्यापुढे हात पसरेल मात्र अनेक देशांना आपण लशी पुरवल्या, असंही ते म्हणाले. 


देशावर अनेकदा दुष्मनाने हल्ले करण्याचे प्रयत्न केले. अनेक सैनिक मृत्यूमुखी पडले पण मोदी आले आणि त्यांनी सर्जिकल स्ट्राईट आणि एअर स्ट्राईक केले. त्यानंतर पाकिस्तानच्या बापाची भारतावर हल्ला करण्याची हिंमत झाली नाही. मोदींनी भारत मजबूर नाही तर मजबूत भारत तयार केला आहे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. 


त्यामुळे यंदा मोदींना आपल्याला पंतप्रधान बनवायचं आहे. त्यासाठी महायुतीच्या पुणे जिल्ह्यातील चारही उमेदवारांना मतदान करायचं आहे. ही निवडणूक लहान-मोठी निवडणून नाही तर देशातं प्रतिनिधीत्व निवडण्याची निवडणूक आहे, त्यामुळे महायुतीला मतदान करा, असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. 


Adhalrao patil : शिरुरच्या मुद्द्यांवर मोदी बोलणार का? विचारल्यास आढळराव पाटीलांचं दणक्यात उत्तर....