पुणे : भोरच्या आमदारांनी (Bhor) गावासाठी साधी बसव्यवस्था केली नाही आणि अजित पवार (Ajit Pawar) पालकमंत्री असताना काय केलं, असं विचारतात. ऐकूण घेतो म्हणून काहीही ऐकूण घ्यायला मी काही मोकळा नाही म्हणत अजित पवार चांगलेच क़डाडले. भोरच्या विकासकामांचा आणि रखडलेल्या कामांचा अजित पवारांनी पाढा वाचला आणि भोरचे विद्यमान आमदार संग्राम थोपटेंवर निशाणार साधाला. सुनेत्रा पवारांना निवडून द्या. मी तिला म्हणेन बस बाई तू माझी बायको आहे. आपल्याला निवडून दिलंय आपण एकत्र विकास करु, तर ती मला अजिबात नाही म्हणणार नाही, असं म्हणत अजित पवारांनी विकास काम करणार म्हणजे करणार, असा विश्वास भोरकरांना दिला. बारामती लोकसभेसाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. भोरमध्ये अजित पवारांनी आज शेवटची सभा घेतली या सभेत अजित पवारांनी सुप्रिया सुळे आणि संग्राम थोपटेंचा चांगलाच समाचार घेतला. 


बारामतीचा विकास मी केला आहे. उगाच बारामतीसारखा विकास होत नाही. बारामती, बारामती अनेल लोक उगाच बोलत नाही. आपलं घर बांधतो तसंच विकासकामांवर लक्ष द्यावं लागतं.   सकाळी 6 वाजता बाहेर पाडतो काम करतो सगकीकडे लक्ष देतो. म्हणून विकासकामं चांगली होतात. मग भोरचा विकास का झाला नाही. इथले आमदार झोपा काढत होते का?, असा हल्लाबोलही अजित पवारांनी थोपटेंवर केला आहे. 


केंद्रातील सर्व निधी आपला मिळालाच असं नाही. मागील 10 वर्षात केंद्राच्या विचारांचा खासदार असल्याने निधी फार मिळायचा नाही. मात्र आता सरकार आपलं येणार आहे. त्यामुळे निधीचा प्रश्न उपस्थित होणार नाही. आपला खासदार राहिला की विकास करणं सोपं जातं. त्यासोबतच बाकी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीदेखील आपले आहेत. त्यांच्याशी बोलून चर्चा करुन काम करुन घेणं आता सोपं आहे. मी काम करणारा माणूस आहे. काम करु दाखवणार म्हणजे दाखवणार, असा विश्वास अजित पवारांनी दिला. 


मी बोलतो तसाच वागतो काम करायचा आहे ते करणारच. आचार संहिता संपू द्या काम करू अनेक कारखाने इथं आणू उद्योग आणू. लोकप्रतिनिधी म्हणून तिथल्या आमदार खासदारांनी गुंतवणूकदारांचे चर्चा करून अडचणी सोडवायच्या असतात तेव्हा विकास होत असतो. तोडगा काढला पाहिजे तर उद्योग टिकतात. पुण्याच्या जवळ असून देखील दुर्दैवाने भोर वेल्हा मुळशीचा विकास झाला नाही, असंही अजित पवार म्हणाले. 


इतर महत्वाची बातमी-


Shrinivas Pawar: घराण्यातील राजकीय संघर्षामुळे अजित पवारांची आई बहिणीकडे राहायला गेली, अजितदादांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील: श्रीनिवास पवार


Sharad Pawar : तेच शरद पवार, तेच बारामती, पण चिन्ह अन् मैदान मात्र वेगळं असणार; अजित पवारांनी हक्काचे मैदान घेतले!