पुणे : पुणे (Pune) जिल्ह्यातील वाबळेवाडीच्या (Pune News) शाळेचा (Wabalewadi School) प्रकरणात जोपर्यंत मी निर्दोष असल्याच सिद्ध होत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही, असा निर्णय दत्तात्रय वारे (Dattaray Ware) गुरुजी यांनी घेतला होता. दोन दिवासांपूर्वी जिल्हा परिषदेच्या चौकशी समितीने (Pune ZP) वारे गुरुजींना निर्दोष ठरवलं. त्यानंतर आज मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी वाबळेवाडीतील शाळेत जाऊन वारे गुरुजींचे पाय धुतले आणि पुन्हा चप्पल घालण्याची विनंती केली. यावेळी वारे गुरुजी भावुक (Emotional) झाल्याचं बघायला मिळालं.
पुणे जिल्ह्यातील (Pune District) वाबळेवाडीच्या शाळेचा कायापालट करणाऱ्या दत्तात्रय वारे गुरुजींची नुकतीच त्यांच्यावरील आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली. गावच्या राजकारणातून वारे गुरुजींवर वाबळेवाडीच्या शाळेत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. यामुळे वारे गुरुजींनी पायात चप्पल घालणं बंद केलं होतं. जोपर्यंत मी निर्दोष असल्याचं सिद्ध होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही, असा निर्धार वारे गुरुजींनी केला होता. आता जिल्हा परिषदेच्या चौकशी समितीने वारे गुरुजींना निर्दोष ठरवल्यावर वारे गुरुजींनी चप्पल घालावी यासाठी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी वारे गुरुजींचे वाबळेवाडीतील शाळेत जाऊन पाय धुतले आणि पुन्हा चप्पल घालण्याची विनंती केली.
नेमका कोणता आरोप होता?
शाळेच्या विकासासाठी गावकऱ्यांचा समावेश असलेली शाळा विकास समिती वाबळेवाडीत काम करत होती. शाळेसाठी ही समिती ऐच्छिक स्वरुपात देण्यात येणाऱ्या देणग्या स्वीकारत होती. देणग्या स्वीकारताना त्याचा व्यवस्थित हिशोब ठेवला नसल्याचं जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दत्तात्रय वारे यांच्या निलंबनाचा ठराव मंजूर करण्यात आला होता.
स्थानिक राजकारणामुळे दत्तात्रय वारे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. दत्तात्रय वारे सकाळपासून रात्रीपर्यंत शाळेत थांबत होते. पण कामात अनियमितता असा आरोप ठेवून त्यांचं निलंबित केल्याचं नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर म्हटलं होतं. गावकऱ्यांनी लाखो रुपये जमा केले, काही कंपन्यांकडून निधी मिळवला, त्याचा हिशोब गावकऱ्यांनी ठेवला. मुख्याध्यापकांचा काहीच संबंध नाही. परंतु, ओढून-ताणून त्यांना या आर्थिक व्यवहारात जबाबदार धरुन निलंबित केल्याचं काही स्थानिकांनी म्हटलं होतं.
इतर महत्वाची माहिती-