पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये घरात घुसून तब्बल चाळीस वार करत एका गुन्हेगाराची हत्या करण्यात आली आहे. दापोडीत मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. अल्विन राजगोपाळ असं 19 वर्षीय मृतकाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आत्या आणि आज्जी सोबत अल्विन दापोडीतील जयभीम नगरमध्ये राहायचा. मध्यरात्री दीडच्या सुमारास त्याच्या विरोधकांचं टोळकं घरात घुसलं. दगड, सिमेंटचा गट्टू आणि कोयत्याने वार करायला सुरुवात केली. झटापटीत आत्या आणि आज्जीमध्ये पडल्याने अल्विनला घराबाहेर खेचण्यात आलं. हल्लेखोरांनी त्याला गल्लीत गाठत त्याच्यावर कोयत्याने 40 ते 45 वार करून ठार केले. अल्विनवर देखील काही गुन्हे दाखल आहेत.
याप्रकरणी चार आरोपींना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर एकाचा शोध सुरू आहे. याप्रकरणी क्लेरा राबर्ट किट्टो यांनी फिर्याद दिली आहे. अभिषेक राजू चव्हाण, रुपेश दिलीप संकपाळ, राहुल वीर उर्फ पप्या, निखिल, सनी गजभिव अशी हल्ला करणाऱ्या आरोपींची नावं असून यातील चार जणांना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेत फिर्यादी यांची आई पुष्पा राज गोपाळ या किरकोळ जखमी झाल्या आहेत.
सराईत गुन्हेगाराची घरात घुसून हत्या केली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Dec 2018 03:54 PM (IST)
पिंपरी चिंचवडमध्ये घरात घुसून तब्बल चाळीस वार करत एका गुन्हेगाराची हत्या करण्यात आली आहे. दापोडीत मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. अल्विन राजगोपाळ असं 19 वर्षीय मृतकाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -