पुणे : राज्यात कोरोना संशयितांचे नमुने जलद गतीने तपासले जाण्यासाठी येत्या पंधरा दिवसांत आठ ठिकाणी नवीन तपासणी लॅब सुरु करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच उद्यापासून  तीन ठिकाणी टेस्टिंगची सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. या नव्या लॅबसाठी एनआयव्हीकडून उपकरण मिळणार असल्याचही त्यांनी सांगितलं. सध्या मुंबईतील कस्तुरबा आणि केईम रुग्णालयात करोना व्हायरसच्या चाचण्याची सुविधा उपलब्ध आहे. लवकरच जे.जे. रुग्णालयात लवकरच चाचणी केंद्र सुरु करण्याचा प्रयत्न आहे” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.


राज्यातील 42 करोना बाधितांची प्रकृती स्थिर असून येणाऱ्या काळात सरकारी कार्यालये पन्नास टक्के कर्मचाऱ्यांवर चालवता येतील का याबद्दल विचार सुरु असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तसेच सकराच्या धोरणांची अंमलबजावणी खात्रीलायक पद्धतीने होईल अशी अपेक्षा आहे.  खासगी कंपनीत वर्क फ्रॉम होमची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल असही त्यांनी सांगितलं.

#Coronavirus | येत्या दहा पंधरा दिवसांत आठ ठिकाणी टेस्टिंग लॅब सुरु करणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे



राज्यात खासगी लॅबलाही चाचणीची परवानगी देण्यात येईल. पण त्यासाठी त्यांना आवश्यक परवानगी घ्यावी लागेल. साहित्याची व्यवस्थाही त्यांनाच करावी लागेल असे राजेश टोपे म्हणाले. तसेच ज्यांची पैसे देण्याची तयारी आहे, ते जास्त पैसे भरुन हॉटेलमध्ये क्वॉरन्टाईनमध्ये राहू शकतात. पण तिथे नियमांची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे असही राजेश टोपे म्हणाले.  तसेचं केंद्र सरकार 10 लाख नवी किट्स विकत घेत आहे, त्यामुळे त्याचाही तुटवडा होणार नाही असं मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलंय.

राज्यात कोरोना संशयितांचे 800 नमुने तपासले गेले त्यापैकी 42 जणांना कोरोनाची लागण झालेय अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सकाळी दिली. त्याच पार्श्वभूंमीवर राजेश टोपे एनआयव्हीला भेट देऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यानी नवीन तपासणी लॅब सुरु करण्याबाबत माहिती दिली. दुबईग्रुपमुळे महाराष्ट्रात ५० टक्के करोना व्हायरसचे रुग्ण वाढले असे राजेश टोपे म्हणाले.

Rajesh Tope Press on Coronavirus | कोरोना व्हायरसचे सँपल तपासण्यासाठी राज्यात नव्या लॅब उभारणार : राजेश टोपे