पुणे : शहातील नायडू रुग्णालय हे कोरोनाबाधित रुग्णांचे केंद्रबिंदू आहे. आजघडीला या रुग्णालयात पुण्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. परंतु, याच रुग्णालयातील एका वृद्ध कोरोनाबाधित रुग्णाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. हा रुग्ण रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गेला. परंतु, सुराक्षकांजवळ पीपीई किट नसल्यामुळे त्याला थांबवण्यास कुणीही पुढे येईना. प्रशासनाचीही धावपळ उडाली. गुरुवारी झालेल्या या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.


कोरोनाची बाधा झालेले काही रुग्ण अनेक दिवस एकाच खोलीत राहिल्याने कंटाळले आहेत. त्यामुळे काहीही करून बाहेर पडायचे असाही काही रुग्णांचा प्रयत्न असतो. पुणे महापालिकेच्या संसर्गजन्य रोगांसाठी असलेल्या नायडू रुग्णालयात गुरुवारी असाच प्रकार घडला. एक वृद्ध रुग्ण रुग्णालयातून घरी जाण्यासाठी निघाला. रुग्णालय प्रशासनाने त्याची खूप समजूत काढली. पण तो कुणाचे काही ऐकायला तयार नव्हता. सोबत आणलेल्या पिशवीसह तो रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचला. सुरक्षारक्षकांनी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केला. पण व्यर्थ. पीपीई किट घातले नसल्यामुळे सुरक्षा रक्षकांना त्याच्या जवळही जाता येईना.


राज्यात आतापर्यंत 6 हजार 564 रुग्ण कोरोनामुक्त तर, आज नवीन 1576 कोरोनाबाधित


हा रुग्ण प्रवेशद्वारातून जेव्हा बाहेर जाण्यास निघाला. तेव्हा एका सुरक्षा रक्षकाने लांब बांबूच्या सहाय्याने त्याला ढकलत खाली पाडले. त्यानंतर काही वेळाने पीपीई किट घालून आलेल्या एका कर्मचाऱ्याने त्याला हाताला धरून वॉर्डमध्ये नेले. आणि इतरांनी सुटकेचा निश्वास टाकला.


रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्याची आवश्यकता
कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने होताना दिसत आहे. या आजारावर कोणत्याही प्रकारची लस अद्याप उपलब्ध झालेली नाही. परिणाणी या आजाराविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज निर्माण झाले आहे. त्यामुळे ज्या रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येतो, अशा व्यक्तींचे मनोधैर्य खचण्याची शक्यता आहे. किमान 14 दिवस एकाच खोलीत उपचार घ्यावे लागत असल्याने एकटेपणाचीही काहींना भीती वाटते. त्यामुळे अशा रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्याची गरज असल्याचे तज्ञांचे मत आहे.


Corona Ground Report | कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट