Pune Crime News : कोयता गँगच्या (koyta gang) विरोधात पुणे पोलिसांनी मोठी (Crime News) कारवाई केली आहे. त्यांनी या गॅंगच्या म्होरक्याला जेरबंद केलं. पुणे पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं होतं आणि या ऑपरेशनच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारांवर (Pune Crime News) कारवाई केली आहे. (Pune Police) यासंदर्भात भाजपनं पोस्टर बाजी केली आहे. त्यात देवेंद्र फडणीसांचा (Devendra fadanvis) फोटो लावण्यात आला आहे. या पोस्टरची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
काय आहे पोस्टरमध्ये?
बीजेपी महाराष्ट्र या फेसबुक पेजवर हे पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. हे कायद्याचं राज्य आहे. कोयत्याचं राज्य आहे. पुण्यात कोम्बिंग ऑपरेशन यशस्वी झालं, असं त्या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे शिवाय पोस्टरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटोदेखील लावण्यात आला आहे. त्यासोबतच देवा भाऊंच्या राज्यात गॅंग कोणतीही असो मुसक्या आवळल्याच जाती, असंही त्यावर लिहिण्यात आलं आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात यशस्वी कॉंम्बिंग ऑपरेशन झाले. गुन्हेगारी आळा घालणारे केवळ युती सरकार आहे, असे या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तस यासोबत शेअर करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये हे कायद्याचे राज्य आहे,’ कोयत्याच नाही असा उल्लेख केला आहे
कॉंम्बिंग ऑपरेशन यशस्वी...
पुण्यातील 'G-20' परिषद आणि वाढत्या दहशतीच्या घटनांपूर्वी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. रोज नवे धाडसत्र सुरुच आहे. पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवलं. त्यात अनेक गुन्हेगारांंची झाडाझडती सुरु केली आहे. त्यात शहरातील 3,765 गुन्हेगारांची चौकशी केली. पोलिसांनी मध्यरात्री विशेष मोहीम राबवून गुन्हेगारांची चौकशी केली. तपासात 698 गुन्हेगार एकाच पत्त्यावर राहत असल्याचे निष्पन्न झालं. त्यांच्याकडून पिस्तूल, काडतुसे, 145 कोयते जप्त करण्यात आले.
या गुन्हेगारांवर कारवाई...
समिर लियाकत पठाण (वय-26हडपसर, पुणे), शोएब लियाकत पठाण (वय 20, हडपसर पुणे) , गणेश ऊर्फ दादा विठ्ठल हवालदार, (वय 22मांजरी, पुणे, प्रतिक ऊर्फ एस के हनुमत कांबळे (वय 20मांजरी, पुणे), गितेश दशरथ सोलनकर (वय 21हडपसर पुणे), ऋतिक संतोष जाधव, (वय- 19मांजरी, पुणे ), साई राजेंद्र कांबळे, (वय-20 मांजरी, पुणे), ऋषिकेश ऊर्फ सोन्या संजय पखाले (वय 24 मांजरी, पुणे) , ऋतिक सुनिल मांढरे, (वय 22 मांजरी रोड,हडपसर पुणे 10 ), प्रतिक शिवकुमार सलगर, (वय 19मांजरी, पुणे) तसेच इतर आरोपी अल्पवयीन आहेत.