Chitra wagh vs Urfi javed : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chita wagh) यांच्यातील वाद संपायचं नाव घेत नाही आहे. चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेत उर्फी जावेदला चांगलंच खडसावलं आहे. त्यासोबतच त्यांनी महिला आयोगावरदेखील भाष्य केलं आहे. आजही सांगते उर्फी जावेद समोर आली तर तिचं थोबाड फोडणार आहे. मात्र थोबाड फोडण्याआधी तिला साडी चोळीही देऊ. त्यानंतरही तिनं नंगा नाच सुरु ठेवला तर तिचं थोबाड फोडणार आहे, अशी आक्रमक भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली आहे. उर्फीला कपड्यांची ऍलर्जी असेल तर सगळ्या प्रकारच्या गोळ्या आहेत, असंही त्या म्हणाल्या आहे.


मागील काही दिवसांपासून उर्फी जावेदच्या फॅशन स्टाईलवरुन हा वाद सुरु आहे. त्यात चित्रा वाघ यांनी महिला आयोगालादेखील या संदर्भात खडेबोल सुनावले होते. त्यानंतर चित्र वाघ यांना महिला आयोगाने नोटीस बजावली होती. महिला आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी दोन दिवसात खुलासा करण्याचं आव्हान करण्यात आलं आहे. त्यानंतर चित्रा वाघांनी आज (7 जानेवारी) पत्रकार परिषद घेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनादेखील खडेबोल सुनावले आहे. 


चित्रा वाघ म्हणाल्या, मुंबईच्या रस्त्यांवर सध्या नंगा नाच सुरु आहे. तो थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.  मात्र काहींनी या प्रकरणात उगाच उड्या घेतल्या आहे. त्यात महिला आयोगाने देखील आमच्या विषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. एकीला जाब विचारायचा आणि दुसरीला गोंजरायचे, असं दिसत आहे. महिला आयोग म्हणजे रुपाली चाकणकर एकट्या नाहीत. त्यांनी मला नोटीस पाठवली आहे अशा 56 नोटीसा रोज येत असतात. नोटीस पाठवताना आयोगाच्या सदस्यांची मंजुरी घेतली का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 


काही दिवसांपूर्वी उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिच्या हातापायावर लाल पुरळं दिसत होते. त्यात की कमी कपडे का घातले याचं कारण सांगितलं होतं.  मला बऱ्याचदा विचारले जाते की, तू कमी कपडे का घालतेस?, पण याचं कारण म्हणजे कपड्यांमुळे होणारी अ‍ॅलर्जी आहे. अंगभर कपडे किंवा लोकरीचे कपडे घातले तर मला अ‍ॅलर्जी होते आणि म्हणूनच मी नेहमी कमी कपड्यांमध्ये तुम्हाला दिसते. मला कपड्यांची अ‍ॅलर्जी आहे, असा खुलासा उर्फीने केला आहे. त्यावरुन चित्रा वाघ यांनी उर्फीला देण्यासाठी आमच्याकडे अॅलर्जीच्या गोळ्या असल्याचं म्हटलं आहे. 


संबंधित बातमी-


chitra wagh Vs rupali chakankar: चित्रा वाघ यांना महिला आयोगाची नोटीस, दोन दिवसात खुलासा करण्याचं आव्हान