पुणे : पुण्याची ओळख असलेल्या चितळे स्वीट्स अँड स्नॅक्स या फर्ममधली मिठाई गुल झाली आहे. कामगारांनी वाढीव पगाराची मागणी केल्यामुळे चितळेंनी त्यांचं काम थांबवलं आहे. चितळे मालक आणि कर्मचाऱ्यांतील या वादानं पुणेकर मात्र गॅसवर आहेत.
या संपामुळे ऐन सणासुदीच्या काळात पुणेकरांना अनेक मिठाईचे पदार्थ मिळणार नाहीत. शहरातल्या काही दुकानांच्या बाहेर तर पुढील काही दिवस पदार्थ उपलब्ध नसणाऱ्या पदार्थांची यादीही लावण्यात आली आहे.
कोकोनट बर्फीसह डिंक लाडू, रवा लाडू, मोतीचूर लाडू, आंबा बर्फी, चिवडा असे अनेक पदार्थ सणासुदीच्या काळात चितळेंच्या दुकानातून गायब झाले आहेत. यामुळे चितळे बंधूच्या ग्राहकांची बरीच निराशा झाली आहे.
चितळे बंधूमध्ये बऱ्याच वर्षापासून अनेक कामगार काम करत आहेत. मात्र, पगारात म्हणावी तशी वाढ होत नसल्याचं येथील काही कामगारांचं म्हणणं आहे. सध्या पुण्यात चितळेंची एकूण 20 दुकानं असून 1000 पेक्षा अधिक कामगार इथं आहेत.
ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात चितळेंच्या दुकानातून मिठाई गुल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Aug 2017 01:17 PM (IST)
पुण्यात चितळेंच्या मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पण ऐन सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानं अनेक पदार्थ चितळेंच्या दुकानातून गायब झाले आहेत त्यामुळे पुणेकरांची मात्र निराशा झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -