Shivendraraje Bhosale : आतापर्यंत आपण जो इतिहास वाचला. त्यात छत्रपती संभाजी महाराजांची ओळख 'धर्मवीर' म्हणूनच इतिहासात केली गेली आहे, त्यामुळं यावरती चर्चा होऊ नये, असं म्हणत  भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी विरोधीपक्ष (Chhatrapati Shivaji Maharaj) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. आज पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चाचं (Hindu Janakrosh Morcha) आयोजन करण्यात आलं आहे. त्यात शिवेंद्रराजे भोसले सहभागी झाले आहे. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.


मागील काही दिवसांपासून सगळीकडे भीतीचं वातावरणं निर्माण झालं आहे. हिंदू समाजात देखील भीतीचं वातावरण आहे. ही भीती कमी करण्यासाठी हा मोर्चा काढला आहे. केंद्रात भाजपचं सरकार आहे. शिवाय मोदीही आहेत. राज्यात देखील भाजपचं सरकार आहे. त्यामुळे मोर्चाची दखल घेण्यात येईल. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. या स्थापनेच्या वेळी धर्माचं रक्षक करावं हादेखील मुद्दा होता. या मोर्चातून आम्हाला कोणालाही विरोध करायचा नाही आहे. आम्ही फक्त आमचा धर्म जपण्याचा प्रयत्न करत आहोत, असंही ते म्हणाले. 


धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज (Chatrapati Sambhaji Maharaj) यांचा बलिदान दिवस धर्मवीरदिन (Dharmavir din) म्हणून साजरा करावा. प्रेमाच्या नावाखाली सुरू असणाऱ्या लव्ह जिहाद (Love jihad) विरोधात कायदा व्हावा. धर्मांतर होऊ नये, त्यासाठी कायदे करण्यात यावेत. गोहत्या (cow slaughter) थांबवण्यात यावी. या सगळ्यांबात कायदे करावे आणि त्याची कठोर अंमलबजावणी करावी, या  मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. 


कार्यकर्ते आणि महिलांचा मोठा सहभाग


या मोर्चात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या आहेत. त्यासोबतच तरुणांचादेखील मोठा सहभाग दिसत आहे. हजारोंच्या संख्येत अनेक संघटनांचे कार्यकर्तेदेखील हातात भगवे आणि डोक्यावर टोपी परिधान करुन सहभागी झाले आहे. महिलांनी शंख नाद करत मोर्चाला सुरुवात केली. त्यासोबतच दगडूशेठ मंदिरात आरतीदेखील केली. आमदार शिवेंद्रराजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजा भैया, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय देसाई यांचा यात विशेष सहभाग झाले आहेत. शहरातील राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळेदेखील या मोर्चात सहभागी झाले आहेत. मोर्चात महिला आणि युवकांचादेखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसत आहे. सकल हिंदू समाजाच्या ताकदीचे या निमित्ताने दर्शन होत आहे. विश्व हिंदू परिषदचे किशोर चव्हाण, पतित पावन संघटनेचे स्वप्निल नाईक, श्री शंभू चरित्र अभ्यासक नीलेश भिसे, राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे सहभागी झाले आहेत.