इंदापूर, पुणे : मराठ्यांकडे 20 टक्के , आमच्याकडे 80 टक्के मतं आहेत. ओबीसी समाजाला ( obc Reservation) 27 टक्के आरक्षण आहे. प्रत्येक जमातीला ब्रॅकेट आहे.  ओबीसी समाजाला सरकारी नोकऱ्या फक्त 9 टक्के मिळाल्यात.  आधी 27 टक्के जागा भरा मग इतर गोष्टी करा, असे म्हणत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे (manoj jarane patil) यांच्यावर टीकास्त्र सोडले.  इंदापूर (Pune Indapur) येथील सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देऊ नका, आमची इतर कोणताही मागणी नाही, असेही भुजबळ यावेळी म्हणाले. 


विचार करणारा मराठा समाज गप्प का ? मराठा समाजाच्या मतांसाठी गप्प आहात का? मतं त्यांची आहेत, मग आमची नाहीत का? त्यांची लेकरं आहेत, मग आमची नाहीत का? असा सवाल यावेळी भुजबळांनी उपस्थित केला.  आरक्षण हा गरिबी हटावण्याचा कार्यक्रम नाही, असे भुजबळ म्हणाले.


आरक्षणावर अनेक नेते बोलायला तयार नाहीत. कसली भीती वाटते आहे? मतांची भीती वाटते का? त्यांच्याकडे मते आहेत आमच्याकडे नाहीत का? त्यांची 20 टक्के आणि 80 आमची आहेत. हर्षवर्धन पाटील, विजयसिंह पाटील तुम्हाला कुणबी सर्टीफिकेट पाहिजे आहेत का? सांगा ना पाहिजे का नाही? तळागाळातील लोकांना वरती आणले पाहिजेत, आमचे लोक गरिब का राहिले असते पण त्यांना काही काळतच नाही. आम्हाला 27 टक्के आरक्षण आहे. यात अनेक जाती आहेत. सरकारमध्ये फक्त आम्हाला 9 टक्के आरक्षण आहे. ते 27 टक्के भरा मग बाकीचे काही करा. लोकसेवा आयोगात 85 टक्के मराठा समाज आहे, सारथी, अण्णाभाऊ साठे, ews मधील 85 टक्के मराठा समाजाचे, कुणबी आहेत ते आमच्यात आहे. पंजाबराव देशमुख कृषी योजना त्यात मराठा समाज आहे, असे म्हणत भुजबळ यांनी सगळे गणीतच मांडले.


मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट देणं ताबडतोब थांबवा


कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात जाती निहाय जनगणना झाली पाहिजे. त्यामध्ये अडचण काय आहे? बिहार करू शकते तर तुम्ही का जनगणना करीत नाही. मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्यायचे सुरु आहे ते थांबवा. न्यायमूर्ती शिंदे सगळीकडे जात आहेत आणि करून घेत आहेत. आमच्या 27 टक्केंतील आरक्षण दिले पाहिजे. पण ओबीसी मधून आरक्षण देता कामा नये. हे जर ऐकू कुणाला गेलं नाही, न्याय आपल्याला मिळाला नाही. तर पडळकर म्हणाल्याप्रमाणे सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है.. असंच करावे लागेल. 


कायदा फक्त आम्हालाच का? जरांगेंवर कारवाई का नाही? 


मी काही बोललो की, काही विद्वान लोक बोलायला लागतात की दोन जातीत भांडणे लागत आहेत. जरांगे यांच्या सभा रात्री उशिरा चालते, पोलीस कारवाई करीत नाही. कायदा फक्त आपल्याला त्यांना नाही. मी 15 दिवसांनी एकदा बोलतो, सौ सुनार की एक लोहार... काही बोलावे लागते, सगळंच ऐकून घ्यायची सवय नाही.  राज्यात अशांतता निर्माण कोण करते? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला  


सराटीमध्ये बचाव करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला - भुजबळ 


राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की, नाही कायदा सुव्यवस्था संभाळण्याची जबाबदारी कुणाची? असा प्रश्न उपस्थित केला.  जालना यथे महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकला. मग पोलिसांनी लाठीचार्ज केला असे मी अनेक दिवसांपासून सांगतोय. पण कोणीच काही बोलायला तयार नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सभागृहात लेखी उत्तर दिले आणि ज्यात त्यांनी 79 पोलीस जखमी झाल्याचे म्हटले आहे. बचाव करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यात 50 जण जखमी झाले. हे आधीच समोर यायला पाहिजे होते. हे आता समोर आल्याचे भुजबळ म्हणाले. 


तू अक्कलेने दिव्यांग झाला आहे - 


आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका.. आम्ही फक्त हेच मागतोय. बहुतांश क्षेत्रात मराठा समाजाचे लोक आहेत.  आम्ही जर पुढे गेले तरी ते आमची लायकी काढत आहेत. 
नारायण कुचे यांच्यावर जरांगे यांना टिंगल केली, असे म्हणत भुजबळांनी जरांगे यांची ऑडीओ क्लिप ऐकून आणि वाचून दाखवली, त्यानंतर मिमिक्रीही केली. तू अक्कलेने दिव्यांग झाला आहे, अशी टीकाही भुजबळांनी यावेळी केली. 


 भुजबळांचे जरांगेंना चॅलेंज -


जरांगेची सभा होती म्हणून अधिकर्यांनी सुट्टी जाहीर केली. अधिकर्यांना अधिकारी म्हणून वागणूक असली पाहिजे. तो येवल्याचे एडपट म्हणतो. 1985 साली त्यांचा जन्म झाला होता की नाही त्यावेळी महापौर आणि आमदार झालो होते. तू ग्रामपंचायत सरपंच होऊन दाखव, असे आवाहनही यावेळी भुजबळांनी जरांगेंना दिले. 


आमचा संयम संपला तर...


घनसावंगी येथे नेत्यांना गावबंदी आणि त्याच शेजारी रोहित पवार यांचे स्वागत. त्याच गावात एका तरुणाने प्रश्न विचारला तर तो दुसऱ्या दिवशी दवाखान्यात होता, त्याला मारहाण केली. पोलिसांना सांगितले गाव बंदीचं बोर्ड काढा पण काढले नाहीत. आमचा संयम संपला तर  क्रोधाला कुणीही आवर घालू शकत नाही.. त्यामुळे पोलिसांनी , सरकारनं लवकर लक्ष घालावे, असे भुजबळ म्हणाले. 


भुजबळांचा हल्लाबोल - 


अतिवृष्टी झाली तिथे मी गेलो. लोकांनी मला काळे झेंडे दाखवले. गो बॅक गो बॅक दाखवलं. मी जिथून गेलो तिथे गोमूत्र शिंपडले. होय आम्ही शूद्र आहोत म्हणून तुम्ही कुणबी प्रमाणपत्र मागता का? वा रे वा चोंग्यांनो, असे म्हणत भुजबळांनी टीका केली. 


एकदा कुणबी प्रमाणपत्र मिळाले तर तो ओबीसी झाला. अशीच यांची दादागिरी राहणार आहे. एका शाळेत दाखल्यात सगळीकडे कुणबी लिहले आहे. जाळपोळ करणाऱ्या लोकांना पिस्तुल सोबत पकडले. तो पिस्तुल सरपंच कुणाचा हे सगळ्यांना माहिती आहे. आणि जरांगे म्हणतात आमच्या लेकरांना पकडले, असे भुजबळ म्हणाले. 


घाबराल, हिंम्मत जर हरलात तर मातीमोल व्हाल - 


24 डिसेंबरनंतर भुजबळ, सरकारला बघतो म्हणतो. सरकार पण ऐकून घेतो. घाबराल, हिंम्मत जर हारलात तर मातीमोल व्हाल. म्हणून भीतीला मारा, असे भुजबळांनी आव्हान केले.  प्रकाश आंबेडकर यांचे आम्ही आभारी आहोत. पवार साहेबांना आणि इतर नेत्यांना मला सांगायचे आहे. तुमचा राग माझ्यावर असू शकतो पण माझा राग ओबीसी वर काढू नका. तुम्ही ओबीसी लढाई लढलात. पण वाचवण्यासाठी पण तुम्हीच यायला पाहिजे राग काढण्याची ही वेळ नाही, असे भुजबळ म्हणाले.