पुणे : मी जेलमधून बाहेर आल्यानंतर पक्षांतराच्या चर्चा सुरु झाल्या, पण पवार साहेबांना सोडून कसा जाईन? अशा शब्दात छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी सोडण्याच्या सर्व शक्यतांना पूर्णविराम दिला. जेलबाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच जाहीर सभेत छगन भुजबळ बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यात हल्लाबोल यात्रेची सांगता करण्यात आली.


अडीच वर्षांनंतर मी जनतेसमोर बोलण्यासाठी उभा आहे. जेलमध्ये असताना सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आपुलकीने विचारपुस केली, असं छगन भुजबळांनी सांगितलं. तसंच जेलमध्ये असताना कुटुंबाची पवार साहेबांनी घरच्यांसारखी काळजी घेतली असं सांगताना भुजबळांना गहिवरुन आलं.

न्यायदेवतेवर माझा विश्वास होता, आहे आणि राहणार, लवकरच निर्दोषत्व सिद्ध करणार, असंही छगन भुजबळ यांनी ठासून सांगितलं. जेलमध्ये असताना माझ्यासाठी मोर्चे काढण्यात आले, सर्व पक्षांचे नेते भेटायला आले त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार मानतो असं म्हणत राष्ट्रवादीचा मंच असल्याने आज मनापासून बोलणार असंही भुजबळ म्हणाले.

मला विनाकारण या प्रकरणात गोवण्यात आलं, जिथे छगन भुजबळ नाव दिसेल तिथे ईडीने धाडी टाकल्या. इतकच काय एकेका ठिकाणी सात वेळा धाडी टाकण्यात आल्या असं म्हणत भुजबळांनी सरकारवर निशाणा साधला.

जेलमधून मी आणि समीर बाहेर आलो, आता खायचं काय ही चिंता होती. मात्र पाहतो तर काय? कुटुंबातील प्रत्येकाच्या खात्यावर 15-15 लाख जमा. अशा शब्दात मोदींच्या काळ्या पैशाविरोधातील मोहिमेवर जोरदार हल्लाबोल केला. मोदींच्या स्टार्टअप इंडिया, मेकअप इंडियानंतर आता रुईनअप इंडिया दिसेल की काय अशी चिंता वाटते असंही भुजबळ म्हणाले.

महाराष्ट्र सदनाच्या बांधकामासाठी मी कंत्राटदार नेमला नव्हता, इतकंच काय त्यावेळी मी मंत्रीही नव्हतो. 100 कोटी रुपयांचा माझा बंगला आहे, सगळं अटॅच केलं, मात्र लोकांचं प्रेम अटॅच नाही करु शकले, अशा शब्दात भुजबळांनी सरकारवर शेलकी टीकाही केली. म्हैस होती पाच फुटांची गाभण, आणि रेडकू निघालं 15 फुटांचं अशी परिस्थिती निर्माण केल्याचंही आपल्या मिश्किल शैलीत भुजबळांनी सांगितलं.

LIVETV : ठोकर लागली की ती तुटते, मात्र ठोकर लागल्यानंतर येते ती कामयाबी : छगन भुजबळ

LIVETV : बचेंगे तो और भी लढेंगे, हम बचेंगे भी और लढेंगे भी : छगन भुजबळ

LIVETV : मी जेलमध्ये असताना आठवड्यातून तीनदा माझे घरचे साहेबांच्या घरी जायचे : छगन भुजबळ

LIVETV : सर्व पक्ष, जाती-धर्मांना सोबत घेऊन गेलं पाहिजे : छगन भुजबळ

LIVETV : 17 टक्के आरक्षण उरलंय आणि 400 जाती आहेत, कसं द्यायचं आरक्षण? : छगन भुजबळ

LIVETV : मराठा समाजाने समजून घ्यावं, तो मोठा भाऊ आहे : छगन भुजबळ

LIVETV : माझं पूर्ण समर्थन, मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा, कुणीही सांगावं मी विरोध केला : छगन भुजबळ

LIVETV : इंदिराजींची आणीबाणी घटनेवर आधारीत होती, आताची आणीबाणी मात्र भीषण आहे : छगन भुजबळ

LIVETV : आपण आत्मसंतुष्ट नाही, चार वर्षात त्यांनी खूप दिलं : छगन भुजबळ

LIVETV : शेतकऱ्यावर कमी भावासाठी जबरदस्ती, शेतकरी रडताएत, पाकिस्तानची साखप आता यांना गोड लागते : छगन भुजबळ

LIVETV : आता गावात आत्महत्या होत नाही, मंत्रालयासमोर होतात : छगन भुजबळ

LIVETV : केवढे चांगले दिवस, शेतकरी आत्महत्या करत नाही, हमीभाव मिळतोय : छगन भुजबळ

LIVETV : चार किमी गंगा दाखवा जी तुम्ही स्वच्छ केली, ते सांगतील सुद्धा, त्यांनी खूप काम केलं आहे : छगन भुजबळ

LIVETV : देशात चार स्मार्ट सिटी दाखवा, चार जिल्हे दाखवा जे पूर्ण प्रकाशमान आहेत, ज्यांच्यातील जनधन खाती जीवंत आहेत : छगन भुजबळ

LIVETV : स्टार्टअप इंडिया, मेकअप इंडियानंतर रुईनअप इंडिया येतंय असं वाटत आहे : छगन भुजबळ

LIVETV : गेल्या चार वर्षात देशात एकही अत्याचार झाला नाही, सर्वत्र शांतता, नोटाबंदीमुळे दहशतवाद संपला : छगन भुजबळ

LIVETV : सर्वांना नोकरी, घराघरात स्वस्त गॅस, केंद्र सरकारचे आभार : छगन भुजबळ

LIVETV : घोड्याला भाव आला, गाड्या सोडून लोकं घोडे घ्यायला लागले, पेट्रोल परवडत नाही : छगन भुजबळ

LIVETV : बाहेर आल्यानंतर खायचं काय? पाहिलं तर सर्व कुटुंबाच्या खात्यात 15-15 लाख जमा : छगन भुजबळ

LIVETV : मै जिंदगी का साथ निभाता चला गया, .... बरबादीयोंका जश्न मनाता चला गया, जो हो गया उसे भुलाता चला गया : छगन भुजबळ

LIVETV : म्हणे 100 कोटी रुपयांचा माझा बंगला आहे, सगळं अटॅच केलं, मात्र लोकांचं प्रेम अटॅच नाही करु शकले : छगन भुजबळ

LIVETV : म्हैस होती पाच फुटांची गाभण, आणि रेडकू निघालं 15 फुटांचं अशी परिस्थिती : छगन भुजबळ

LIVETV : महाराष्ट्र सदनाच्या कंत्राटदाराची नेमणूक मी केली नाही, त्यावेळी मंत्रीही नव्हतो : छगन भुजबळ

LIVETV : महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाचा कंत्राटदारही छगन भुजबळने नेमला नाही : छगन भुजबळ

LIVETV : वाघ म्हातारा झाला म्हणून गवत खात नाही : छगन भुजबळ

LIVETV : जिथे- जिथे छगन भुजबळ नाव तिथे धाडी टाकल्या : छगन भुजबळ

LIVETV : कुणी वाघ म्हणतंय, कुणी माकड म्हणतंय, बंदर उछलना तो छोडेगा नही : छगन भुजबळ

LIVETV : हा राष्ट्रवादीचा मंच, त्यामुळे मनापासून बोलणार : छगन भुजबळ

LIVETV : माझ्यासाठी सर्व पक्षांचे नेते पाठिशी राहिले, सर्वांचेच आभार : छगन भुजबळ

LIVETV : माझ्या सुटकेसाठी मोर्चे काढण्यात आले, मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानतो : छगन भुजबळ

LIVETV : न्यायदेवतेवर माझा विश्वास होता, आहे आणि राहणार, लवकरच निर्दोषत्व सिद्ध करणार : छगन भुजबळ

LIVETV : अडीच-तीन वर्षांनंतर तुमच्यासमोर बोलायला उभा आहे, सवय आहे की गेली? : छगन भुजबळ