Pune Swargate to Katraj Metro Line Extension : पुणे : पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली असून लवकरच हा मेट्रो मार्ग पुणेकरांच्या सेवेत हजर असेल. नव्या मार्गिकेला line 1 B असं नाव दिलं जाणार आहे. तसेच, स्वारगेट ते कात्रज असा 5.46 किमीचा असणार आहे.
पुणे मेट्रो (Pune Metro Line) फेज-1 प्रकल्पाच्या स्वारगेट (Swargate) ते कात्रज (Katraj) अशा जवळपास साडे- पाच किमी लांबीच्या विस्तारास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी (Approval Of The Union Cabinet) देण्यात आली आहे. 2 हजार 954 कोटींचा हा प्रकल्प 2029 पर्यंत कार्यान्वित होणार आहे. मार्केट यार्ड, बिबवेवाडी, बालाजी नगर आणि कात्रज ही उपनगर कव्हर करणार आहे. फेब्रुवारी 2029 पर्यंत ही मार्गिका पूर्ण होईल, असं सांगण्यात आलं आहे. 2954.53 कोटी एवढा खर्च या नव्या मार्गिकेसाठी होणार आहे. दरम्यान, महा मेट्रोकडून काम करण्यात येणार आहे.
पुणे मेट्रो फेज-1 प्रकल्पाच्या दक्षिणेकडे स्वारगेट ते कात्रजपर्यंत 5.46 किमी लांबीच्या विस्तारास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. जवळपास 12,200 कोटी रुपये खर्चाच्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, साकेत इत्यादी प्रमुख भागांना हा प्रकल्प जोडला जाणार आहे.
विधानसभा निवडणुकांची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. अशातच महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं महाराष्ट्रातील दोन मोठ्या मेट्रो प्रकल्पांच्या घोषणा केल्या आहेत. केंद्र सरकारनं महाराष्ट्रील ठाणे आणि पुणे या शहरांना नव्या मेट्रो मार्गाची भेट दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यासाठी 'ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्प', तर पुण्यामध्ये पुणे मेट्रो प्रकल्पाच्या (टप्पा एक) स्वारगेट ते कात्रज या विस्तारीकरण या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांना केंद्रानं मंजुरी दिली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतील महाराष्ट्रासाठीचे निर्णय :
- वाढवण बंदरासाठी 76 हजार 200 कोटीचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजूर
- पुणे मेट्रो फेज-1 प्रकल्पाच्या दक्षिणेकडे स्वारगेट ते कात्रज पर्यंत 5.46 किमी लांबीच्या विस्तारास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
- प्रकल्पाची एकूण पूर्णता किंमत 2,954.53 कोटी रुपये आहे आणि 2029 पर्यंत कार्यान्वित होणार आहे.
- जवळपास 12,200 कोटी रुपये खर्चाच्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.
- नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, साकेत इत्यादी प्रमुख भागांना जोडण्याचा प्रकल्प
पाहा व्हिडीओ : Eknath Shinde On Narendra Modi : ठाणे इंटिग्रल मेट्रोला परवानगी, शिंदेंनी मानले मोदींचे आभार