पुण्यातील शिरुरमध्ये बंधाऱ्यात कार पडून चौघांचा मृत्यू
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 15 Apr 2017 12:05 AM (IST)
पुणे: पुण्यातल्या शिरुर तालुक्यात बंधाऱ्यात कार पडल्यानं चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मांडवगण फराटा गावात भीमा नदीवरील बंधाऱ्यात ही घटना घडली. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. नंदा गायकवाड, नवनाथ पवार, प्रतिभा पवार आणि आबा प्रल्हाद जठार अशी मृत पावलेल्यांची नावं आहेत. हे चौघेही जण बारामतीला गेले होते. बारामतीहून परतत असताना ही दुर्देवी घटना घडली. अपघातग्रस्त गाडी ही स्विफ्ट डिझायर होती. भीमा नदीवरील पुलावरुन जाताना कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यात ही कार पडली. त्यात कारमधील चार जणाचा मृत्यू झाला.