पिंपरी: महाराष्ट्रातील बैलगाडयांच्या शर्यतीवरील बंदी उठवण्याची मागणी करत चाकणमध्ये बैलगाडा मालकांनी आंदोलन केलं. तामिळनाडूतील जलिकुट्टी खेळाला देखील या आंदोलनातून पाठिंबा दर्शवला आहे.

तामिळनाडूतील जलिकट्टूवरुन चिघळलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कायदे मंत्रालयाने जलिकट्टू अध्यादेशाला काही बदलांसह मंजुरी दिली आहे. हा अध्यादेश अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवला येणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातही बैलांच्या शर्यतीवरील बंदी उठवण्याची मागणी जोर धरत आहे.

बैलांच्या शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी चाकणमधील बैलगाडा मालकांनी आंदोलन केले. बैलगाडा मालकांच्या या आंदोलनामुळे पुणे-नाशिक महामार्ग ठप्प झाला होता.

संबंधित बातम्या

'जलिकट्टू'च्या अध्यादेशाला काही बदलांसह केंद्राची मंजुरी