पुणे : ब्लू व्हेल गेमचं भयानक रुप दिवसेंदिवस वाढत जात असून, आता पुण्यातही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्लू व्हेल गेमचा टास्क पूर्ण करण्याच्या नादात पुण्याच्या दिशेने रवाना झालेल्या एका मुलाला भिगवण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले.
सोलापुरातील 14 वर्षीय मुलगा टास्क पूर्ण करण्याच्या निमित्ताने पुण्याच्या गाडीत बसून रवाना झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि मग पोलिसांनी भिगवण पोलिसांशी संपर्क साधून त्या मुलाला वाटेतच उतरवलं. त्यामुळे आतापर्यंत शहरात असलेलं हे ब्लू व्हेल गेमचं जाळं आता ग्रामीण भागातही पसरू लागलं आहे.
भिगवण पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला असला, तरी ब्लू व्हेल गेमचं जीवघेणं रुप पुन्हा एकदा समोर आले आहे आणि ते अगदी ग्रामीण भागातही पोहोचलं आहे.
दरम्यान, पोलिसांनी या मुलाच्या कुटुंबियांशी संपर्क साधला आहे.
‘ब्लू व्हेल’च्या नादात मुलगा सोलापूरहून थेट पुण्यात!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Aug 2017 10:17 AM (IST)
ब्लू व्हेलच्या नादात किशोरवयीन मुलगा सोलापूरहून थेट पुण्याच्या दिशेने, पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून मुलगा भिगवणमध्ये ताब्यात
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -