पुणे : एका वर्षात अयोध्येत राम मंदिर उभारलं जाईल, अशी ग्वाही भाजपचे जेष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामींनी दिली आहे. 'विवेक संवाद'च्या वतीनं आयोजित व्याख्यानमालेत 'असहिष्णूता सत्य की आभास' या विषयावर बोलत होते. यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांनी विविध विषयांना स्पर्श करत काँग्रेसवर टीका केली.
चिदंबरम आणि शशी थरुर लवकरच तुरुंगात जातील
काँग्रेस सरकारमधील ज्या नेत्यांनी भ्रष्टाचार किंवा चुकीची कामे केली. त्यातील ए.राजा, कनीमुळी यांना तिहारमध्ये जावे लागले. आता चिंदबरम आणि शशी थरूर यांना देखील लवकरच जेलमध्ये जावे लागणार आहे. त्याची सध्या तयारी सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सत्य समोर येऊ नये म्हणून 'इंदू सरकार'ला विरोध
'इंदू सरकार' सिनेमाला होणाऱ्या विरोधाबद्दल बोलताना स्वामी म्हणाले की, ''देशात सध्या 'इंदू सरकार' या सिनेमाबाबत जोरात चर्चा सुरु आहे. पण काँग्रेस सत्य परिस्थिती समोर येऊ नये म्हणून याला विरोध करत आहे. याला सहिष्णूता की असहिष्णूता म्हणयाची हे ठरवा.'' अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
गोहत्या करणाऱ्यांना कडक शासन
गोहत्येसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, ''देशात गो हत्या सत्र सुरु असून, त्याला कायम विरोध राहणार. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. असे कृत्य करणाऱ्या कडक शासन झाल्याशिवाय राहणार नाही, '' असंही त्यांनी सांगितले.
डॉ. आंबेडकरांच्या नावापुढे पंडित ही उपाधी जोडा
राज्यघटनेच्या निर्मितीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव करताना स्वामी म्हणाले की, देशाच्या संविधानामध्ये पंडित नेहरु यांचे योगदान होते, असे बोले जातं. मात्र त्यांचे केवळ 370 हा कायद्यासाठी होते. खरे योग्यदान बाबासाहेब आबेंडकर यांचेच आहे. त्यांचे योगदान लक्षात घेता त्यांना भारतरत्न देण्यास देखील उशीर झाला. आता बाबासाहेब आंबेडकरांच्या नावापुढे पंडित ही उपाधी जोडली जावी,'' अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
एका वर्षात अयोध्येत राम मंदिर उभारणारच : सुब्रमण्यम स्वामी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jul 2017 09:26 AM (IST)
एका वर्षात अयोध्येत राम मंदिर उभारलं जाईल, अशी ग्वाही भाजपचे जेष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामींनी दिली आहे. 'विवेक संवाद'च्या वतीनं आयोजित व्याख्यानमालेत 'असहिष्णूता सत्य की आभास' या विषयावर बोलत होते. यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांनी विविध विषयांना स्पर्श करत काँग्रेसवर टीका केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -