मुंबई : पुण्यातील मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे जनतेने पाठ फिरवली असली, तरी त्याच सदाशिव पेठेत पुण्यातील सर्वाधिक मतदानाची नोंद झाली होती. विशेष म्हणजे याच प्रभागात भाजपला घवघवीत यशही मिळालं आहे. त्यामुळे मत देतो, पण झोपेच्या वेळेत सभेला येणार नाही, असा काहीसा संदेश पुणेकरांनी फडणवीसांना दिला आहे. पुण्यात भाजपने तब्बल 89 जागांवर विजय मिळवत क्लीन स्वीप दिला आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 15 म्हणजे शनिवार पेठ-सदाशिव पेठेत 62.51% मतदान झालं. पुण्यामध्ये सरासरी 54 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली होती. सदाशिव पेठेत गेल्या शनिवारी दुपारच्या वेळी भाजपची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुणेकरांच्या नियमांचा अनुभव घेतला होता. मतदारांनी पाठ फिरवल्यामुळे अखेर फडणवीसांनी सभा रद्द करत पिंपरी-चिंचवडकडे कूच केली होती. पुण्यातील सभेत काय झालं होतं ? गर्दीच नसल्याने सभाच गुंडाळण्याची नामुष्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओढावली. सदाशिव पेठेतील टिळक रोडच्या सभेकडे पुणेकरांनी पाठ फिरवल्याने, मुख्यमंत्र्यांना भाषण न करताच माघारी फिरावं लागलं. या सभेला गर्दी नसल्याचं पाहून, मुख्यमंत्र्यांनी समन्वयाचं कारण देत, सभा रद्द करत असल्याचं ट्विट केलं. मुख्यमंत्री सभेसाठी आले, मात्र या सभेला अत्यंत तुरळक प्रतिसाद होता. दुपारच्या सभेसाठी मुख्यमंत्री येऊन 15 मिनिटे झाली, तरीही त्यांची सभा सुरु झाली नाही. गर्दीच नसल्याने मुख्यमंत्री 15 मिनिटांपासून स्टेजवर गेले नाहीत. मुख्यमंत्री स्टेजच्या बाजूलाच खाली थांबले होते. या सभेसाठी आणलेल्या असंख्य खुर्च्या तशाच रिकाम्या दिसत होत्या. मंचावर पालकमंत्री गिरीष बापट आणि भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले होते. मात्र मुख्यमंत्री खालीच होते. मुख्यमंत्र्यांनी सभा घेतलेल्या दहा महापालिकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. मुंबई- (13 सभा) 82 जागांवर विजय ठाणे- (3 सभा) शिवसेनेची सत्ता पुणे- (4 सभा) भाजपला बहुमत पिंपरी-चिंचवड- भाजपला बहुमत नाशिक- 67 जागांसह सत्ता नागपूर- 91 जागा जिंकत बहुमत अकोला- 48 जागांवर भाजपचा विजय अमरावती- 44 जागांसह भाजपला बहुमत सोलापूर 102 पैकी 49 जागांसह भाजपला बहुमत जिल्हा परिषद औरंगाबाद- 62 पैकी 23 जागांवर भाजप विजयी जालना – 56 पैकी 22 जागांवर भाजप विजयी हिंगोली - 52 पैकी 10 जागांवर भाजप विजयी उस्मानाबाद- 55 पैकी 4 जागांवर भाजप विजयी बीड- 60 पैकी 20 जागांवर भाजप विजयी नांदेड- 63 पैकी 13 जागांवर विजयी परभणी- 54 पैकी 5 जागांवर विजयी लातूर- 58 पैकी 36 जागांवर विजयी अहमदनगर- 72 पैकी 14 जागांवर विजयी सोलापूर- 68 पैकी 19 जागांवर विजयी जळगाव- 67 पैकी 33 जागांवर विजयी नाशिक- 73 पैकी 15 जागांवर विजयी अमरावती- 59 पैकी 14 जागांवर विजयी बुलडाणा- 60 पैकी 24 जागांवर विजयी यवतमाळ- 61 पैकी 18 जागांवर विजयी रत्नागिरी- 59 पैकी 3 जागांवर विजयी सिंधुदुर्ग- 50 पैकी 6 जागांवर विजयी सातारा- 64 पैकी 7 जागांवर विजयी कोल्हापूर- 67 पैकी 10 जागांवर विजयी सांगली- 60 पैकी 25 जागांवर विजयी