Devendra Fadnavis : पुणे शहर भाजपच्या शिवाजी नगर भागात नवीन पक्ष कार्यालयाचे शुक्रवारी उद्घाटन देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलं. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकेचा बाण सोडला. ते म्हणाले की, ही गर्दी पाहून खात्री पटली की पुन्हा पुणे महापालिकेवर भाजपचा भगवा आणि आर.पी.आयचा निळा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. मला आता भगवा फडकणार असं आवर्जून सांगायला लागतय. कारण भगव्याची शपथ घेतलेल्यांना त्याची लाज वाटतेय.


भाजपकडून पुणे महापालिकेसमोर मोठा कार्यक्रम घेण्यात आला. चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती.  महापालिकेसमोर  उभारण्यात आलेल्या स्टेजमुळे  जंगली महाराज रस्त्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली.  त्यामुळे शिवाजीनगर भागात मोठी वाहतूककोंडी झाली होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपकडून आगामी महापालिका निवडणुकांचं एका आर्थाने रणशिंग फुंकले गेल. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांकडून आणि इच्छुक उमेदवारांकडून या कार्यक्रमाच्या ठिकाणी समर्थकांसह मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी शिवसेनासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला.


यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, हे आमचे शक्तिप्रदर्शन नाही. आम्ही शक्तिप्रदर्शन करायचे ठरवले तर पुण्यातील एकही मैदान पुरणार नाही. ही गर्दी पाहून खात्री पटली की पुन्हा पुणे महापालिकेवर भाजपचा भगवा आणि आर पी आय चा निळा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. पुणे शहर भाजपच्या शिवाजी नगर भागात नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होतय. 


परवा संसदेत दंगा करणाऱ्या बारा खासदारांना निलंबित करण्यात आले.  त्यामधे शिवसेनेचे दोन खासदार होते.  संसदेची माफी मागणार का असं या खासदारांना विचारल्यावर ते म्हणाले माफी मागायला आम्ही काय सावरकर आहोत का  ? अरे निर्लज्जांनो ज्या सावरकरांनी आंदमानात कोलुचा बैल बनून शिक्षा भोगली त्यांच्याबद्दल असे बोलता. भ्रष्टाचाराने कमावलेल्या पैशातून बांधलेल्या महालात राहणाऱ्यांनी सावरकरांवर चिखलफेक केली आणि तुम्ही त्यात सहभागी होता. होय आम्ही हिंदुत्ववादी आहेत,  होय आम्ही सावरकरवादी आहोत, असे फडणवीस म्हणाले.



पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांसाठी लस उपलब्ध करून दिली. इतर देश भारताला लस देत नव्हते. पण मोदींनी लस दिली. राज्य सरकार दावा करते की आम्ही दहा कोटी लसीकरण केले.  पण ती लस मोदींनी दिली आहे. राज्यसरकारकडून फक्त वसुली सुरुय. जिल्ह्या जिल्ह्यात नेते आणि अधिकारी मिळून वसुली करतायत. महाराष्ट्रातील नोकरशाही संपुष्टात येतेय. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात पुणे महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनला होता. पण भाजपच्या काळात इथे विकासकामे झाली. पुण्यात शिवसेना नावालाही उरलेली नाही. पुणेकर विकासाच्या मागे जाणार आहेत. पुन्हा महापालिकेत सत्ता मिळाल्यावर पुण्याला देशातील सर्वोत्तम शहर बनवल्याशिवाय राहणार नाही, असे फडणवीस म्हणाले.