शहरात अनाधिकृत फ्लेक्सचा सुळसुळाट असून, महापालिका याकडे कानाडोळा करत असल्याचा कामठे यांनी आरोप केला. पुरावा म्हणून दोन टेम्पो भरून आणलेले अनधिकृत फ्लेक्स महापालिका प्रवेश द्वारात त्यांनी फेकले.
एकहाती सत्ता असलेल्या भाजपला कामठे यांनी या आंदोलनातून घरचा आहेरही दिला. आंदोलन करणारे कामठे यांना निवडणूक आयोगाला बनावट कागदपत्रं सादर केल्याप्रकरणी गेल्या नोव्हेंबरमध्ये सांगवी पोलिसांनी अटक केली होती.
या प्रकरणी जामिनावर असणारे कामठे यांनी महापालिकेसमोर केलेलं हे काही पहिलंच आंदोलन नाही, तर याआधी राष्ट्रवादी काँग्रेस-मनसे नगरसेवकांनी असे आंदोलन केले आहेत. त्याप्रकरणी त्यांच्यावर महापालिकेकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे आता भाजपच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.