Bill Gates On AI Tools : येत्या पाच वर्षात AI मुळे (AI News) प्रत्येकाच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहे, असं भाकित मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स (bill gates ) यांनी केलं आहे. ते नेहमीच नवनवीन विषयावर आपलं मत व्यक्त करत असतात. यावेळी त्यांनी मात्र AI मुळे भविष्यात होणाऱ्या बदलांवर भाष्य केलं आहे. कंप्यूटर क्षेत्रापासून ते सर्वसामान्य लोकांच्या जगण्यावर AI मुळे मोठे बदल होणार आहे. AI पॉवर्ड डिजिटल एजेंट्स आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणार असल्याचंदेखील ते म्हणाले.


येणाऱ्या पिढीसाठी AI पॉवर्ड डिजिटल एजंट्स हे महत्वाचं काम करणार आहे. हे टूल फक्त कंटेंट साठी काम करणार आणि माणसांना आळशी बनवणार नाही तर माणसांना प्रोडक्टिव बनवण्यात देखील मदत करणार आहे. अनेकांच्या कामाची स्पीड वाढवण्यासाठी देखील मदत होणार आहे. 


इलॉन मस्क यांच्या xAI यांनी Grok टूल लॉंच केलं आहे. याआधी ओपन एआय चॅट जीपीटी,गूगल, बार्ड आणि मायक्रोसॉफ्ट बिगचॅट बॉट लॉंच केलं आहे त्यासोबत आणखी अनेक कंपनी या सगळ्या सिस्टमवर काम करत आहे. AI च्या वाढत्या वापरावरदेखील बिल गेट्स यांनी भाष्य केलं आहे. मेल लिहून तो ड्राफ्ट करणं सोपं होणार आहे. त्यासोबतच मिटींगचे अपडेट, डॉक्युमेट्सला स्लाईड शोमध्ये करणंदेखील सोपं होणार असल्याचं ते म्हणाले आहेत. 


बिझनेस प्लॅन ते टेूल बुकींगही करणार AI एजंट


येत्या काळात AI पॉवर्ड डिजिटल एजंट्स आपल्याला आपला बिझनेस प्लॅन तयार करायला मदत करणार आहे. त्यासाठी लागणारे प्रेसेंटेशन, वाढदिवसाची आठवण त्यासोबतच हॉटेलमधील टेबल बुक करण्यातदेखील महत्वाची भूमिका बजावणार आहे. AI पॉवर्ड डिजिटल एजंट्सच्या मदतीने प्रेझेंटेबल बिझनेस प्लॅन करुन आपण विविध क्षेत्रात सोप्या पद्धतीने काम करु शकणार आहोत. 


अनेक कंपनीचं काम एजंटवर अवलंबून असतं. एजंट नसले की अनेक कंपनीचं काम थांबतं. मात्र AI पॉवर्ड डिजिटल एजंट्स येत्या काळात कमी किंमतीत उपलब्ध होणा आहे. जेणेकरुन प्रत्येकजण या एजंटचा वापर करु शकेल. येत्या काळात सगळं बदललेलं असेल, टेक्नॉलॉजी फार पुढे गेलेली असेल आणि याच टेक्नॉलॉजीचा वापर करुन सर्वसामान्यांची कामं सोपी होणार आहे. येत्या काळात प्रत्येकाचं आयुष्य बदलेलं असेल, असा दावा त्यांनी केला आहे. 


इतर महत्वाची बातमी-


What Is Juice Jacking : एकीकडे फोन फुल्ल चार्ज अन् दुसरीकडे खिसा थेट रिकामा; सायबर भामट्यांना नवा फंडा, Juice Jacking प्रकरण नेमकं आहे तरी काय?